जे कोणालाच जमलं नाही ते मुंबई इंडियन्सने तब्बल 4 वेळा केलं!

Mumbai Indians | देशामध्ये आयपीएलचा हंगाम सुरू आहे. क्रिकेट चाहते दररोज आयपीएलचा मनमुरादपणे आनंद लुटतात. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल हंगाम 2024 मध्ये अनेक वेगवेगळे ट्वीस्ट घडताना दिसत आहेत. पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा पराभव झाला. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने कमबॅक करत सलग दोन सामन्यात एकहाती विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एकदा दोनदा नाहीतर तब्बल चारवेळा विक्रम केलाय.

पहिल्या तीन सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला पराभव स्विकारावा लागलाय. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध आणि आरसीबी विरूद्ध मुंबईने अधिक ओव्हर शिल्लक ठेवत एकहाती विजय मिळवला. असा विक्रम मुंबईने एक वेळा नाहीतर तब्बल चार वेळा आपल्या नावे केलाय. असा विक्रम इतर कोणत्याच संघाला करता आला नाही.

मुंबई इंडियन्स संघाचा जलद विजय

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशिवाय इतर कोणत्याही संघाला 190 धावा करत 3 ओव्हर राखून सामना जिंकता आला नाही. मात्र मुंबईने हा पराक्रम चारवेळा केला आहे. हा पराक्रम कोणत्याही संघाला करता आला नाही.

मुंबईने आरसीबी विरूद्ध 197 धावा केल्यात. या धावा 27 चेंडू राखून केल्या आहेत. म्हणजेच 15.3 ओव्हारमध्ये 197 धावा केल्यात. आरसीबी विरूद्ध मुंबईने केलेली कामगिरी म्हणजे सर्वात वेगवान तिसरा विजय आहे. तसेच गत हंगामात आरसीबी विरूद्ध मुंबईने 16.3 ओव्हरमध्ये जलद विजय मिळवला होता.

मुंबई इंडियन्सने 2014 रोजी राजस्थान रॉयल्सविरोधात 190 धावांचा यशस्वी आणि वेगवान पाठलाग केला होता. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला असून 14.4 ओव्हरमध्ये सामना विजयी झाला. 2017 मध्ये पंजाबविरूद्ध इंदूरला 15.3 ओव्हरमध्ये 190 पेक्षा अधिक धावांचा टप्पा गाठला आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.

News Title – Mumbai Indians 4 Time Very Fast Winning

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ

भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल