पत्नीने पतीसमोर चुकूनही करू नयेत ‘या’ गोष्टी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे देशातीलच नाहीतर जगातील विद्वान आचार्य आहेत. त्यांच्या चाणक्यनीतीचे (Chanakya Niti) अनेक चाहते आहेत, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. आचार्य चाणक्य मानवाच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अनेक गोष्टींचं मार्गदर्शन करत असतात. मानवाने आपल्या आयुष्यामध्ये कधी? कुठे? केव्हा? कोणासोबत? कसं राहावं? याबाबत अनेकदा आचार्य चाणक्य मार्गदर्शन करत असतात. अशातच आता चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाबाबत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

वैवाहिक जीवनात काहीजण खूश असतात, तर काहीजण नाखूश असतात, यावेळी आचार्य चाणक्य यांनी पती आणि पत्नी यांच्यात सतत होणाऱ्या वादाचं कारण सांगितलं आहे. पती आणि पत्नीमध्ये अनेकदा वाद होतो. हा वाद होऊ नये म्हणून पत्नीनं आपल्या पतीसमोर कसं राहावं याबाबत आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी मार्गदर्शन केलंय.

आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा

पत्नीने आपल्या पतीसोबत नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. सासरच्यांबद्दल वाईट बोलू नये. सासरच्यांचा आदर करावा. पतीची ओढ ही त्यांच्या आई वडिलांकडे अधिक असते. म्हणून आचार्य चाणक्य सांगतात की पत्नीने नेहमी आपल्या सासरच्याबाबत वाईट बोलू नये.

वडिलांच्या घरातल्या गोष्टी पत्नीनं सांगू नये

अनेकदा पती आपल्या पत्नीला भूतकाळातील गोष्टी तसेच माहेरच्या लोकांबाबत विचारण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आचार्य चाणक्य सांगतात की पत्नीने आपल्या पतीला आपल्या वडिलांच्या घराबाबत तसेच अंतर्गत गोष्टींबाबत काहीही सांगू नये.

कौटुंबिक कलह होऊ नये म्हणून…

अनेकदा घरामध्ये विवाह झाल्यानंतर सासू आणि सूनेमध्ये वाद होताना दिसतो. यामुळे पतीला नेमकं कोणाच्या बाजूनं बोलावं हे कळत नाही. जर पत्नीने आपल्या पतीला घरगुती वादाबद्दल काहीही सांगितलं तर वाद वाढण्याची शक्यता असते. यामुळे वैवाहिक जीवन आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

परपुरूषांचा विषय काढू नये

आचार्य चाणक्य यांनी पतीप्रती फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. पत्नीने नेहमी आपल्या पतीसोबत बोलत असताना परपुरूषांचा अधिक विषय घेऊ नये. यामुळे पतीचा अहंकार दुखाऊ शकतो. यामुळे ताण ताणाव वाढण्याची चिन्हे असतात.

Chanakya Niti | Acharya Chanakya Say Wife Don’t Do This Things Front Of Her Husband
महत्त्वाच्या बातम्या

आरसीबी विरुद्ध विकेट्सचा ‘पंच’, बूमराहने पटकावली पर्पल कॅप

11 अफेअर्स करत विवाह न करता अभिनेत्री झाली आई, कारण आलं समोर

विराटकडे असलेली ऑरेंज कॅप ‘या’ खेळाडुकडे जाणार?, टॉप 5 मध्ये कोण?

“निवडून द्या अन्यथा…”, नितेश राणेंची सरपंचांना धमकी

‘लेकीच्या आंधळ्या प्रेमापोटी….’; रूपाली ठोंबरेंनी शरद पवारांना दाखवला आरसा