पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गॅस सिलेंडरबाबत केली सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | भाजपचा जाहीरनामा जाहीर झाला आहे. या जाहीरनाम्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही घोषणा केल्या आहेत. शेतकरी, सर्वसामान्य, तरूण-तरूणींसाठी महत्त्वाच्या योजनांच्या घोषणा केल्यात. आता गॅस सिलेंडरबाबत मोठी अपडेट समोर आलीये. आता घरोघरी ही सुविधा देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून उज्ज्वल गॅस योजना आणि सर्वसामान्यांच्या घरगुती गॅस योजनेवर अनुदान दिलंय. घरोघरी गॅस पाईपलाईन पुरवण्याचं उद्दीष्ट भाजप समोर ठेवण्यात आलंय. (Narendra Modi)

काही महिन्यांपासून गॅसच्या दरात वाढ नाही

सरकारी कंपन्यांनी सात महिन्यांपासून गॅसच्या दरात वाढ केली नाही. 14.2 किग्रॅमच्या गॅसमध्ये वाढ करण्यात आली नाही. उलट 300 रूपयांची कपात करण्यात आली. काही महिने झालं किंमत स्थिर आहे. याबदलामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र हा बदल निवडणुकीच्या तोंडावर आहे की यापुढेही असाच बदल असेल ही येणारी वेळ सांगेल. (Narendra Modi)

लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे होणार जमा

गेल्या मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने उज्जवल योजनेअंतर्गत 300 रूपये प्रती सबसिडी जाहीर केली. ही सबसिडी मार्च 2024 पर्यंत लागू केली असून पुन्हा  31 मार्च 2025 पर्यंत सबसिडी वाढवण्यात आली. सबसिडीची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. (Narendra Modi)

केंद्रीय पेट्रेलियममंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दोन वर्षांआधी संसदेमध्ये एक माहिती दिली. प्रश्नोत्तराच्या तासात घरोघरी गॅस पाईपलाईन सुविधा पुरवण्याच्या योजनेबाबत माहिती दिलीय. गॅस पाईपलाईनचा देशभरात विस्तार करण्यात आला असल्याचं हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं.

दरम्यान नरेंद्र मोदी बोलत असताना, देशामध्ये सध्या अस्थिरता आहे. यामुळे देशामध्ये स्थिर सरकारची आवश्यकता असल्याचं नरेंद्र मोदी म्हणालेत. देशात जर कठोर सरकार असेल तर ते कठिण निर्णय घ्यायला मागे पुढं पाहणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणालेत.

News Title – Narendra Modi Announce Manifesto Gas Pipeline Facility

महत्त्वाच्या बातम्या

आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार लढत!

भाजपचं मोठं आश्वासन! आता घरोघरी मिळणार ही सुविधा

प्रत्येक नागिरकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित असायलाच हव्या!

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर; राजस्थानचा रॉयल विजय

अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं