अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं

Salman Khan House Firing News l बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पहाटे 4.50 च्या सुमारास दोन अज्ञातांनी हा हवाई गोळीबार केला आहे. दोन्ही शूटर दुचाकीवरून आले आणि चार राऊंड गोळीबार करून तेथून पळून गेले. मात्र या घटनेत काही दुर्घटना झाली नसल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे पोलिसांनी सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे.

सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी :

या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. डीसीपीही घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडातील निवासस्थानावरही हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्याचे सलमान खानशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जात होते, त्यामुळे हा हल्ला करण्यात आला असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

Salman Khan House Firing News l यापूर्वीही सलमानला आली होती धमकी :

2023 मध्ये देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानच्या ऑफिसला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली होती. सध्या सलमानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

मात्र आता घटनेनंतर मनोरंजन सृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास देखील करत आहेत. त्यामुळे ही घटना का घडली व कोणी घडवली याचा खुलासा पोलीस लवकरच करणार आहेत.

News Title – Salman Khan House Firing News

महत्त्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तीने प्रवास करणे टाळावा; अन्यथा वाईट घटना घडण्याची शक्यता

“अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला”

“दात निघालेला शक्तीहीन आणि तोंडानं हवा मारणारा वाघ लोकांना नको”

पत्नीने पतीसमोर चुकूनही करू नयेत ‘या’ गोष्टी

पुणे हादरलं! नग्न व्हिडीओ काढत अल्पवयीन मुलीसोबत केलं भयानक कृत्य