राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर; राजस्थानचा रॉयल विजय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RR vs PBKS Highlights l IPL 2024 च्या हंगामातील कालचा सामना फारच रोमांचक झाला आहे. राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. सॅम कुरनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जला 3 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला आहे. अशातच आता राजस्थान रॉयल्सने यंदाच्या मोसमातील पाचवा विजय नोंदवला आहे.

राजस्थान रॉयल्सने यंदाच्या मोसमातील मिळवला पाचवा विजय :

पंजाबने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य होते. राजस्थान रॉयल्सने यंदाच्या मोसमातील पाचवा विजयसंजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने संथ सुरुवात करूनही 19.5 षटकांत 7 विकेट्स राखून लक्ष्य गाठले आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो शिमरन हेटमायर ठरला आहे.

या तुफान फलंदाजाने शेवटच्या षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे. शिमरॉन हेटमायर 10 चेंडूत तब्बल 27 धावा करून नाबाद परतला आहे. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.

RR vs PBKS Highlights l संजू सॅमसनचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर! :

राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने 28 चेंडूत सर्वाधिक 39 धावा केल्या. तर तनुष कोटियनने 31 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. या संघाचा कर्णधार संजू सॅमसनने 14 चेंडूत 18 धावा केल्या. तर ध्रुव जुरेल 11 चेंडूत 6 धावा करून हर्षल पटेलचा बळी ठरला. शेवटच्या षटकांमध्ये रोव्हमन पॉवेलने 5 चेंडूत 11 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

मात्र अशाप्रकारे राजस्थान रॉयल्सने मोसमातील पाचवा विजय नोंदवला आहे. आता राजस्थान रॉयल्सचे 6 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. सध्या संजू सॅमसनचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता पंजाब किंग्जचे 6 सामन्यांत 2 गुण झाले आहेत. हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. मात्र, सातव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सचेही 4 गुण आहेत, मात्र हार्दिक पंड्याच्या संघाचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे हा संघ सातव्या क्रमांकावर आहे.

पंजाब किंग्जसाठी कागिसो रबाडा आणि सॅम कुरन हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. या दोन्ही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले आहे.

News Title – RR vs PBKS Highlights

महत्त्वाच्या बातम्या-

अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं

या राशीच्या व्यक्तीने प्रवास करणे टाळावा; अन्यथा वाईट घटना घडण्याची शक्यता

“अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला”

“दात निघालेला शक्तीहीन आणि तोंडानं हवा मारणारा वाघ लोकांना नको”

पत्नीने पतीसमोर चुकूनही करू नयेत ‘या’ गोष्टी