प्रत्येक नागिरकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित असायलाच हव्या!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti l डॉ. भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात अगदी उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी त्यांची 134 वी जयंती साजरी करणार होत आहे.

या कारणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात :

डॉ. भीमराव आंबेडकर ज्यांना बाबासाहेब म्हणूनही ओळखले जाते. ते एक प्रख्यात विद्वान, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि वकील होते. त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले. बाबासाहेबांची जयंती ही सामाजिक सलोखा आणि एकता असल्याने एकत्र येण्याचा दिवस म्हणून साजरी केली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील एका महार कुटुंबात झाला होता. त्यावेळी भारतातील जातिव्यवस्था अतिशय कठोर होती. त्यामुळे बाबासाहेबांना लहानपणापासूनच भेदभावाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मेहनत घेतली आणि परदेशात काही शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षणात प्रावीण्य देखील मिळवले आणि कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी देखील मिळवली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti l बाबासाहेबांनी समानतेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले :

तसेच बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परतले आणि कायद्याचा सराव सुरू केला. दलित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये समानतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उत्थानासाठी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. भारतीय संविधानात आरक्षण प्रणाली समाविष्ट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते संविधानातील मूलभूत अधिकार आणि संघराज्य रचनेचे खंबीर पुरस्कर्ते होते.

News Title – Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर; राजस्थानचा रॉयल विजय

अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं

या राशीच्या व्यक्तीने प्रवास करणे टाळावा; अन्यथा वाईट घटना घडण्याची शक्यता

“अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला”

“दात निघालेला शक्तीहीन आणि तोंडानं हवा मारणारा वाघ लोकांना नको”