“गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही कुठे आहात?”; विरोधकांनी सरकारला सुनावलं

Mahayuti Oath Ceremony

Salman Khan | अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्याच्या घराबाहेर तीन फायरिंग राऊंड करण्यात आल्याची माहिती समोर आली. यावरू आता ठाकरे गटाच्या नेत्यानं सरकारवर निशाणा साधला आहे.

सलमानच्या घराबाहेर गोळीबार

सलमानच्या (Salman Khan) घराबाहेर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामुळे आता सलमान खानच्या (Salman Khan) अडचणीत वाढ होऊ लागली आहे. या घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलीस ब्रांच त्या ठिकाणी तैनात झाली. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबारामुळे वांद्रे शहर हादरून गेलंय. यानंतर याप्रकरणाला राजकीय रंग प्राप्त होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट समोर आलीये. या घडलेल्या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सुरक्षिततेबाबत सवाल केले आहेत.

सलमान खानच्या (Salman Khan) अपार्टमेंटबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी सरकारच्या सुरक्षित यंत्रणांवर भाष्य केलंय. ते म्हाणाले की, सलमान खान असो वा इतर सामान्य माणूस कोणीही असो, मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणालाच सुरक्षित वाटत नाही.

गृहमंत्री कुठेय? मुख्यमंत्री कुठेय?

मुंबईमध्ये नुकताच गोळीबार झाला. त्यानंतर डोंबिवलीतही गोळीबार झाल्याची घटना घडली. सकाळी सलमानच्या घराबाहेरही गोळीबार झालाय. कायदा सुव्यवस्था कुठेय? गृहमंत्री कुठेय? मुख्यमंत्री कुठेय? गुन्हेगार बेधडकपणे रस्त्यावर फिरत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा दखल घेतली, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

सकाळी पहाटे सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. तीन राऊंड फायरिंग करण्यात आली. क्राईम ब्रांच घटनास्थळी पोहचली असून तपास सुरू आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सुरक्षा तैनात करण्यात आलीये. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचलीये. आरोपीची ओळख पटण्यासाठी आम्ही आजूबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहोत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीये.

News Title – Salman Khan Galaxy Apartment Around Firing

महत्त्वाच्या बातम्या

प्रत्येक नागिरकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित असायलाच हव्या!

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर; राजस्थानचा रॉयल विजय

अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं

या राशीच्या व्यक्तीने प्रवास करणे टाळावा; अन्यथा वाईट घटना घडण्याची शक्यता

“अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .