“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Supriya Sule demanded the resignation of Devendra Fadnavis

Salman Khan Firing | सलमान खान गोळीबार (Salman Khan Firing) प्रकऱणाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. अभिनेता सलमान खानला अनेकदा मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अशातच देशातील लोकसभा निवडणूक जवळ येताच महायुती सरकार सत्तेवर असताना सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Salman Khan Firing) झाल्याची घटना घडलीये.

सलमानच्या घराबाहेर अज्ञात दोन व्यक्तीने गोळीबार केल्यानं आता वांद्रे परिसर हादरून गेलंय. याप्रकरणी आता महाविकास आघाडीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तर थेट महायुती सरकारला “अबकी बार गोळीबार सरकार”, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलंय. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे.  (Salman Khan Firing)

“अब की बार गोळीबार सरकार”

सलमान खानच्या गोळीबार प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. याभररस्त्यात जर गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार, यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यात आणि देशात नेमकं काय चाललंय?, असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी केलाय.

पुण्यात कोयता गँग शब्द तरी माहिती होता का? ट्रिपल इंजिनमधील सरकारमध्ये कोणी क्राइम वाढवला?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य केलंय.

संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर बरसले

“सलमान खान ही सिनेविश्वातील मोठं नाव आहे. म्हणून मला तुम्ही त्याबद्दल विचारत आहात. पण मुंबईसह महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था उद्धस्त झाली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची अर्थिक राजधानी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतून सोडून गेलेल्यांसाठी सुरक्षा तैनात असते. गल्लितला एखादा माणूस जरी शिंदे गटात गेला तरीही त्यांना सुरक्षा पुरवली जातेय. भाजपचे सर्व चिल्लर कार्यकर्ते, शिंदे गटाचे चिल्लर कार्यकर्ते आणि अजित पवार यांचे चिल्लर कार्यकर्ते यांना पोलीस संरक्षण दिलं जातंय,” असं संजय राऊत म्हणालेत.

News Title – Salman Khan Firing After Political Leader Reaction

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गॅस सिलेंडरबाबत केली सर्वात मोठी घोषणा!

KKR चा संघ लखनौला रोखणार का? दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार

आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार लढत!

भाजपचं मोठं आश्वासन! आता घरोघरी मिळणार ही सुविधा

प्रत्येक नागिरकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित असायलाच हव्या!

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .