आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RCB vs SRH Team Prediction l आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ एकमेकांना भिडण्यास सज्ज झाले आहेत. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात आरसीबीच्या संघाची अवस्था अत्यंत बिकट आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालीआरसीबीने 6 पैकी फक्य 1 सामने जिंकला आहे तर 5 सामने गमावले आहेत.

RCB vs SRH Team Prediction l एम चिन्नास्वामीची खेळपट्टी कशी खेळेल? :

आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात आरसीबीचा मुंबई इंडियन्सकडून 7 गडी राखून पराभव झाला, तर आज पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादकडे विजयाची हॅट्ट्रिक साधण्याकडे लक्ष असणार आहे.

एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टी ही फलंदाजांची फायदेशीर आहे. हे मैदान लहान असल्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्यात गोलंदाजांना अडचणी येतात. बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी मैदानावर एकूण 146 सामने खेळले गेले आहेत. चिन्नास्वामीच्या या सामन्यात एकूण 90 आयपीएल सामने खेळले गेले, ज्यामध्ये 42 सामने यजमान संघाने जिंकले आणि 42 सामने पाहुण्या संघाने जिंकले आहेत तर 4 सामन्यांमध्ये निकाल लागलेला नाही.

RCB विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हेड-टू-हेड रेकॉर्ड :

आरसीबीवर सनरायझर्स हैदराबादचा वरचष्मा आहे. आयपीएलमध्ये आरसीबी आणि एसआरएच यांच्यात एकूण 23 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी आरसीबीने 10 सामने जिंकले, तर सनरायझर्स हैदराबादने 12 सामने जिंकले. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

गेल्या पाच सामन्यांमध्ये आरसीबीने तीन सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने दोन सामने जिंकले आहेत. त्याचवेळी चिन्नास्वामी मैदानावर दोन्ही संघांमध्ये एकूण 8 सामने खेळले गेले, ज्यामध्ये आरसीबीने 5 सामने जिंकले आणि सनरायझर्स हैदराबादने 2 सामने जिंकले आहेत.

RCB vs SRH Team Prediction l दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार :

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे संभाव्य शिलेदार :

एफ डू प्लेसिस (C), विराट कोहली, आरएम पाटीदार, डब्ल्यूजी जॅक्स, एमके लोमरोर, दिनेश कार्तिक, एमजे डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, एलएच फर्ग्युसन, आकाश दीप

सनरायझर्स हैदराबादचे संभाव्य शिलेदार :

अभिषेक शर्मा, टीएम हेड, एके मार्कराम, के नितीश कुमार रेड्डी, एच क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), बी कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

News Title – RCB vs SRH Team Prediction

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?

“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही कुठे आहात?”; विरोधकांनी सरकारला सुनावलं

सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?, मोठी अपडेट समोर