एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून इनकमिंग सत्र पाहायला मिळत होतं आणि इतर पक्षातून आऊटगोईंग सत्र पाहायला मिळत होतं. मात्र आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटामध्ये शिंदे गटाच्या माजी आमदाराची लवकरच एंट्री होणार असल्याच्या चर्चा आहे. याआधी माढ्यातून धैर्यशील पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली मात्र त्यांना भाजपने उमेदवारी न दिल्यानं ते नाराज आहेत. तर त्यानंतर त्यांनी भाजप पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटामध्ये येणार असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटामध्ये जोरदार इनकमिंग होत असल्याचं पाहायला मिळतंय.

जळगाव जिल्ह्यातून भाजप नेते श्रीराम पाटील यांनी भाजपला राम राम करत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवली. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांनी जोराचा धक्का दिलाय. कारण पश्चिम महाराष्ट्रातील शिंदे गटातील माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडून थेट शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलंय.

शिंदेंच्या हुकुमी एक्क्याचं शरद पवार गटात लवकरच कमबॅक

नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत. 2014 ते 2019 मध्ये ते आमदार होते. ते आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्यानं शिंदे गटाला झटका बसणार आहे. करमाळ्यात शरद पवार यांची 26 तारखेला सभा होणार आहे. शरद पवार यांच्या सभेला नारायण आबा शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

2014 रोजी नारायण पाटील हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2019 मध्ये त्यांनी बंड करून अपक्ष उमेदवारी लढवली. त्यावेळी त्यांनी 72 हजार मतं घेतली पण ते इतर कोणत्याही पक्षात गेले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते एकनाथ शिंदेसोबत गेले आणि पुन्हा ते शरद पवार यांच्या गटात येणार असल्याची शक्यता आहे.

माढ्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण माढ्यातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट न दिल्यानं धैर्यशील मोहीते पाटील यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिलाय. तर माढ्यातूनच अभयसिंह जगताप शरद पवार गटातून माढा लोकसभेसाठी इच्छूक आहेत. यामुळे आता धैर्यशील आणि अभयसिंह जगताप या दोघांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाईल? याबाबत संभ्रम आहे. यामुळे माढा लोकसभेचा तिढा शरद पवार गटासाठी निर्माण होऊ शकतो.

News Title – Sharad Pawar NCP Joined Narayan Patil  Shivsena Leader

महत्त्वाच्या बातम्या

“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही कुठे आहात?”; विरोधकांनी सरकारला सुनावलं

सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?, मोठी अपडेट समोर

‘अशा’ पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहावं

युजवेंद्र चहलला पर्पल कॅप मिळूनही धोका?, कारण आलं समोर