सलमान खान गोळीबार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan Firing | अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan Firing) वांद्रे येथील घरावर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळी मुंबई पोलिसांची ब्रांच तैनात झाली. याप्रकरणामुळे वांद्रे परिसर हादरून गेलं. गोळीबार (Salman Khan Firing) झाला तेव्हा सलमान खान (Salman Khan Firing) हा घरात होता. गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे का?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. दरम्यान दिवसभर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होताना दिसते. (Salman Khan Firing)

पोस्ट व्हायरल

अन्यायाविरूद्ध लढई होणार असेल तर लढाई योग्य. सलमान खान आम्ही ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलंय. तुला आमची ताकद समजावी. आणखी परिक्षा घेऊ नको. ही पहिली आणि शेवटची इनिंग, ज्या दाऊद इब्राहिमला आणि छोटा शकीलला देव मानलं. त्याच्या नावाची कुत्री आम्ही पाळली आहेत. बाकी जास्त बोलण्याची आम्हाला गरज नाही. जय श्रीराम, जय भारत, अशी पोस्ट गोळीबारानंतर व्हायरल झाली आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या भावानं केला गोळीबार?

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट ही बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईनं केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या पोस्टबद्दल अनेक शंका उपस्थित होताना दिसत आहेत. पोलीस आणि सायबर पोलीस ही पोस्ट नेमकी कोणी टाकली आहे. याचा तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला धमकीचे मेलद्वारे मेसेजेस येत आहेत. त्याला काही दिवसांआधीच मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसांआधी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईनं जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सलमान खान दोन दिवसांआधी ईद दिवशी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलेरीमध्ये आला होता. त्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गर्दी केली होती. यामुळे पोलिसांनी सोम्य लाठीहल्ला केला. त्यानंतर लगेचच सकाळी पाच वाजेच्या सुमारास सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केल्याची घटना घडली. यामुळे वांद्रे परिसरात भितीचं वातावरण आहे.

News Title – Salman Khan Firing News Update

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?

“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही कुठे आहात?”; विरोधकांनी सरकारला सुनावलं

सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?, मोठी अपडेट समोर

‘अशा’ पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहावं