‘4 जूनला निकाल लागला तर ठिक, नाहीतर…’; जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्वांचं लक्ष हे राज्याच्या राजकारणाकडे लागलंय. अशातच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांनी मोठी घोषणा केलीये. लोकसभा नाही पण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange )म्हणालेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा 4 जूनला मार्गी लागला तर ठिक, नाहीतर पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्यादा दावा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलाय.

“लोकसभेत उतरलो नाही पण विधानसभेची…”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने देशाला न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही. माझा लोकचळवळीचा मार्ग आहे. आम्ही लोकसभा निवडणूक लढवली नाही, पण विधानसभा निवडणुकीची तयारी करणार आहे. मराठा कोणाच्या सभांना जात नाहीत. ते केवळ उमेदवार पाडणार आहेत. तो देखील आमचा विजय आहे. प्रकाश आंबेडकर यांना 6 जाती-धर्मांची लोकं एकत्र करता आली असती. आम्हाला वेळ कमी होता. लोकसभा निवडणुकीचं कार्यक्षेत्र मोठं असतं, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणालेत.

“…तर पुन्हा आंदोलन सुरू करणार”

“मी मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरांच्या बाजूनं आहे. 6 जूनपर्यंत मऱाठा आरक्षणाचा प्रश्न मिटला नाहीतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार आहे. आम्हाला महायुतीने काही दिलं नाही. पण महाविकास आघाडीवाले तरी कुठे शहाणे आहेत. त्यांनी होतं ते आरक्षण घालवलं”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर केलीये.

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही. भावनेच्याभरात राजकारणात मत घेता येत नाही. मी निवडणूक लढणार नाही. माझा मराठा बांधव महत्त्वाचा आहे. अनेक जाती धर्मांच्या लोकांनी मला साथ दिली होती. यामुळे मी खासदार देखील झालो असतो. पण राजकारण हे आपलं क्षेत्र नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. सरकारने मराठा समाजाला टीकणारं 13 टक्के आरक्षण दिलं. मात्र, मनोज जरांगे आणि मराठा समाजाने सगेसोयरे, कुणबी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी अद्यापही कायम ठेवलीय. मात्र सध्या आंदोलन हे आचारसंहितेमुळं निवळलंय.

News Title – Manoj Jarange Big Announcement About Maratha Reservation

महत्त्वाच्या बातम्या

“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही कुठे आहात?”; विरोधकांनी सरकारला सुनावलं

सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?, मोठी अपडेट समोर

‘अशा’ पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहावं

युजवेंद्र चहलला पर्पल कॅप मिळूनही धोका?, कारण आलं समोर