iPhone 15 वर मिळतंय तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

iPhone 15 offer price | प्रत्येक युवाला आपल्याकडे आयफोन असावा, अशी इच्छा असते. मात्र, या फोनची किंमत जवळपास लाखोंच्या घरात आहे. आता तुम्हीही हा फोन खरेदी करू शकता. iPhone 15 या फोनवर कंपनीने खास डिस्काउंट ठेवलं आहे. त्यामुळे या ऑफरचा वापर करून तुम्हीही हा महागडा फोन खरेदी करू शकता.

iPhone 15 या फोनवर तब्बल 14 हजारांचं डिस्काउंट मिळणार आहे. Flipkart Mega Savings Sale ची सुरुवात झाली आहे. हे सेल आज म्हणजेच 15 एप्रिलपर्यंत असणार आहे. याच सेल अंतर्गत iPhone 15 वर डिस्काउंट मिळत आहे.

iPhone 15 वर मिळणार 14 हजारांचं डिस्काउंट

Flipkart च्या Mega Savings Sale मध्ये अनेक बँक ऑफर्स लिस्टेड आहेत. येथे HDFC बँक सोबतच इतर काही बँका 10 टक्के कॅशबॅकही देत आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही डील खूप फायद्याची ठरणार आहे. या फोनवर काही इतर ऑफरही देण्यात आल्या आहेत.

iPhone 15 खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला तुमचा जुना हँडसेट एक्सचेंज करायचा असेल तर , फ्लिपकार्टवर याचेही ऑप्शन आहे .चांगल्या कंडिशनच्या फोनवर मोठं डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट वर हा फोन 65,999 रुपयांमध्ये लिस्टेड करण्यात आला आहे.

iPhone 15 स्पेसिफिकेशन

त्याची मुळ किंमत ही 79,990 रुपये आहे. अशात हा हँडसेट तुम्हाला 15 हजारांच्या डिस्काउंटवर मिळत आहे. फोनला 6.1 inch चा डिस्प्ले देण्यात आलाय, जो Super Retina XDR OLED पॅनल आहे. याच्या प्रोटेक्शनसाठी Ceramic Shield चा वापर करण्यात आला आहे.

iPhone 15मध्ये Apple A16 Bionic (4 nm) चिपसेट लावण्यात आलंय. हा हँडसेट iOS 17 सोबत येतो. याच्यात स्टोरेजचे चार ऑप्शन आहेत. याच्यात डुअल रियर कॅमेरा सेटअप असून 48MP प्राइमरी कॅमेरा आणि 12MP चा सेकेंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 12MP चा कॅमेरा आहे. iPhone 15 मध्ये वायर्ड और वायरलेस चार्जिंग दोन्ही सुविधा आहेत.

News Title –  iPhone 15 offer price

महत्त्वाच्या बातम्या-

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार

या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?