सलमानच्या घराखाली फायरिंग करणारा ‘कालू’ नेमका कोण?, अचंबित करणारी माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan | बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे. पहाटे 4.50 च्या सुमारास दोन अज्ञातांनी त्याच्या घरावर हवाई गोळीबार केला. दोन्ही शूटर दुचाकीवरून आले आणि चार राऊंड गोळीबार करून तेथून पळून गेले.

आता या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या विशाल राहुल उर्फ ​​कालूचे नाव समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून विशालने हरियाणातील रोहतक येथे एका बुकीची हत्या केली होती. आता हा कालू नेमका कोण आहे?, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट समोर

या प्रकरणाच्या अधिकच्या तपासासाठी 15 पोलिस पथके तयार करण्यात आली असून, ते प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. ज्या बाईकवरून गोळीबार करणारे हल्लेखोर आले होते, ती बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. या बाईकची फॉरेन्सिक टीम कसून तपास करत आहे. या हल्ल्याप्रकरणी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या भावानंतर आता कुख्यात गुन्हेगार रोहित गोदाराचेही नाव पुढे आले आहे.

तसेच गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचा फोटोदेखील समोर आला आहे. त्यांच्यापैकी एक हल्लेखोर हा काळ्या-पांढऱ्या टीशर्टमध्ये होता तर दुसऱ्याने लाल टीशर्ट घातला होता. त्याचसोबत 29 फेब्रूवारी 2024 चे एक सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले असून तो हरियाणाच्या रोहतकमधील एका ढाब्यावरील आहे.

येथे विशाल नावाची एक व्यक्ती दिसत आहे.सलमानच्या घराबाहेर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकाचा चेहरा हा त्या विशालशी मिळता जुळता असल्याचं सांगितलं जातंय. विशाल उर्फ कालू याने सलमानच्या घराबाहेर फायरिंग केले असावे असा अंदाज आता बांधला जात आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळ्या झाडताना दिसणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक गुरुग्राममधील असल्याचा संशय आहे. गोळीबारानंतर अनमोल बिश्नोई याने एका कथित ऑनलाइन पोस्टमध्ये या गोळीबाराची जबाबदारी घेतली. हा तर फक्त एक ‘ट्रेलर’ होता, अशी धमकीही त्यातून सलमानला देण्यात आली.

कोण आहे विशाल राहुल उर्फ कालू ?

गोळीबारमध्ये सहभागी असलेला विशाल राहुल उर्फ ​​कालू हा गुरुग्रामचा रहिवासी असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याच्यावर 5पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यात गोळीबार आणि दुचाकी चोरीसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.विशालवर गुरुग्राम तसेच दिल्लीतही अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून विशालने हरियाणातील रोहतक येथे एका बुकीची हत्या केली होती. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेत तो गोळीबार करताना दिसत आहे.

विशाल हा राजस्थानचा कुख्यात गँगस्टर रोहित गोदाराचा शूटर आहे. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा संबंध हरियाणातील शूटर्सशी निगडीत असल्याने या याप्रकरणी हरियाणा पोलिसही आता तपास करत आहेत.

News Title : Salman Khan House Firing case Who Is Vishal Rahul Aka Kalu

महत्त्वाच्या बातम्या-

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार

या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?