मुंबईच्या पराभवानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याला झापलं, म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | देशामध्ये आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या सामन्यात रंगत निर्माण झाली आहे. सीएसके विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाला चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आता मुंबईचे चाहते पुन्हा एकदा पांड्याला (Hardik Pandya) टोचून बोलू लागलेत. पुन्हा एकदा पांड्याला त्यांनी डिवचलं आहे. अशातच आता चौथ्या पराभवानंतर पांड्याला (Hardik Pandya) एका माजी दिग्गज क्रिकेटरने टोकलं आहे. (Hardik Pandya)

पांड्याच्या (Hardik Pandya) सीएसके विरूद्ध केलेल्या कॅप्टनशिपवर माजी क्रिकेटपटू पीटरसनने अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पांड्याने वेगवान गेलंदाजांना मार पडत असताना स्पिनर्स का खेळवले नाहीत?, असा सवाल केला. श्रेयस गोपालने फक्त एक ओव्हर गोलंदाजी केली. मोहम्मद नबीने सुद्धा त्याचा गोलंदाजीचा कोटा पूर्ण केला नाही. यावरून दिग्गज माजी क्रिकेटपटू पीटरसनने प्रश्न उपस्थित केलेत.

पीटरसनने पांड्याला टोकलं

पांड्याच्या कर्णधारपदाबाबत बोलत असताना पीटरसन म्हणाला की, “संघ खेळत असताना कर्णधाराकडे A प्लॅन असताना त्याने B प्लॅन खेळवला. ज्यावेळी B प्लान खेळवण्याची गरज होती त्यावेळी त्याची अंमलबजावणी करता आली नाही”, असं पीटरसन म्हणाला.

टॅस आणि फिल्डिंगच्यावेळी पांड्याच्या चेहऱ्यावरचं हसू हे खोटं होतं, असं केविन पिटरसनने म्हटलंय. मुंबई इंडियन्स सामन्यावेळी पांड्यासमोर रोहितचा जय-जयकार केला जात होता. चाहते पाठ फिरवतात तेव्हा कसं वाटतं, त्याची कल्पना आहे. असं पीटरसन म्हणाला. “टॉसच्यावेळी पांड्या हसत होता मी आनंदी आहे, पण तो केवळ आतून दुखी होता. प्रत्यक्षात तो आनंदी नाहीये. हे सुद्धी मी अनुभवलंय. याचा सर्व तुमच्यावर परिणाम होतो, असं पीटरसन म्हणाला आहे.

धोनीच्या 20 धावा मुंबईच्या अंगलट

पीटरसनने पांड्या सध्या हूटिंगचा सामना करत असल्याचा दावा केला. दरम्यान सामन्यावेळी शेवटच्या षटकात पांड्याच्या गोलंदाजी वेळी धोनीने केवळ 4 चेंडूत 20 धावा केल्यात. त्यातील तीन षटकार आहेत. याच धावा मुंबई इंडियन्स संघाला अंगलट आल्या आहेत.

News Title – “Hardik Pandya Fake Smile”, Kevin Pietersen Statment

महत्त्वाच्या बातम्या

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार

या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल