सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणाल्या…

Salman Khan Firing

Salman Khan Firing | काही महिन्यांआधी शिवसेना ठाकरे गटाचे दिवंगत नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला. अशातच सलमानच्या घरावर गोळीबार (Salman Khan Firing) करण्यात आल्यानंतर त्याच्या घराबाहेर संरक्षण देण्यात आलंय. तर मग हे संरक्षण मला का नाही? माझ्याही जीवाला धोका असल्याचं घोसाळकर यांची पत्नी मेघना घोसाळकर यांनी म्हटलंय.

सोशल मीडियावर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी सरकारवर एक नाहीतर अनेक प्रश्न उपस्थित करत टीका केलीये. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Salman Khan Firing) करण्यात आला. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली. माझ्याही जीवाला धोका आहे. मग हे संरक्षण मला का मिळालं नाही?, असा सवाल त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

8 फेब्रुवारीला मॉरिस नरेन्हाने दहिसर येथे अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. याप्रकरणामध्ये माॅरिस आणि घोसाळकर या दोघांची हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येकडं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तेजस्वी यांनी केलाय. घोसाळकर कुटुंबाने आपल्या पतीच्या प्रकरणावर योग्य तो तपास होत नसल्याचा आरोप केलाय. यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी घोसाळकर यांच्या गोळीबार प्रकरणावर पोस्ट लिहून अनेक प्रश्न उपस्थित केलेत.

तेजस्वी घोसाळकर यांची पोस्ट चर्चेत

“अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Salman Khan Firing) करण्यात आल्यानं लगेचच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीने त्वरित कारवाई केली. या हाय-प्रोफाईल घटनेवर त्वरित लक्ष केंद्रीत करण्यात आलं. पण माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या केसचा उलगडा करण्यासाठी पोलीस दुर्लक्ष करत आहेत.”

“सलमान खानच्या घराबाहेर (Salman Khan Firing) गुन्हा झाल्यानंतर गुन्हे शाखेची सर्व युनिट एकत्र आली. मात्र मॉरिस नरेन्हाकडून माझ्या पतीची हत्या करण्यात आली. त्या मर्डर केसकडे लक्ष घातलं गेलं नाही,” असा आरोप तेजस्वी यांनी केलाय.

मला सलमान खानसारखं संरक्षण का दिलं नाही?

“अभिषेक घोसाळकर यांच्यानंतर माझ्या जावीला धोका असताना माझ्या सुरक्षेकडं दुर्लक्ष केलं जात आहे, ही चिंताजनक बाब आहे. मला सलमान खानसारखे संरक्षण दिलं का नाही? असाही सवाल तेजस्वी यांनी केलाय. तो सेलिब्रिटी आहे की सामान्य व्यक्ती याचा विचार न करता त्याच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे”, असं पोस्टमध्ये तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिलं आहे.

News Title – Salman Khan Firing After Abhishek Ghosalkar Wife Social Media Post Viral

महत्त्वाच्या बातम्या

वरुण धवनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

मारुती सुझुकी लवकरच बाजारात धुमाकूळ घालणार; ग्राहकांना मिळणार भन्नाट फीचर्स

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .