‘मागच्या 10 वर्षांत जे झालं तो फक्त ट्रेलर होता…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डीडी न्यूज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. या मुलाखतीत त्यांनी आपला देशाच्या विकासासाठी पुढच्या 25 वर्षांचा प्लॅन तयार आहे. आतापर्यंत झालेला विकास हा केवळ ट्रेलर होता. आगामी काळात आणखी महत्त्वाचे निर्णय होणार आहेत, अस मोदींनी सांगितलं. 2024 च्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या 5 ते 6 दशकांचं काम आणि भाजपचं 10 वर्षांचं काम याची तुलना करुन निर्णय घ्यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलं.

2047 आणि 2024 यांना मिक्स करता येणार नाही. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव साजरा करत होता, त्यावेळी हा विषय सर्वांसमोर मांडायला सुरुवात केली होती. बरोबर ठीक दोन वर्षांपूर्वी. 2047 ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील. स्वाभाविकपणे असे माईलस्टोन आपल्यात नवा उत्साह भरतात, नव्या संकल्पासाठी व्यक्तीला तयार करतात. ही एक संधी आहे, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

पुढील 25 वर्षांचे माझं प्लॅनिंग आहे- नरेंद्र मोदी

मी अनेक वर्ष मुख्यमंत्री होतो. सातत्याने निवडणुका आचारसंहिता लागू होतात. माझ्या राज्यातील मोठे अधिकारी निवडणुकीच्या कामाला जातात. त्यामुळे मी अधिकारांना अगोदरच काम देतो. निवडणुकांसाठी 100 दिवस अगोदर पासून प्लॅन तयार केला आहे. मी 15 लाख लोकांचे मत ऐकले की, पुढील काळात भारत कसा झाला पाहिजे? मी तंत्राज्ञाचा उपयोग केला. पुढील 25 वर्षांचे माझे प्लॅनिंग आहे, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

2024 चा क्रम हा निवडणुकीच्या दृष्टीकोनाने आलेला क्रम आहे. देशाच्या समोर एक संधी आहे. एक काँग्रेस सरकारचं धोरण आणि भाजप सरकारचं धोरण, त्यांचं पाच-सहा दशकांचं काम हे त्यांच्यासाठी एक मोठं मैदान आहे. माझं काम तर फक्त 10 वर्षांचं आहे. कोणत्याही क्षेत्राबद्दल तुलना करा. काही कमी असेल तरी आमच्या प्रयत्नांमध्ये काहीच कमी राहणार नाही, असं दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

माझ्या मनात खूप मोठमोठे प्लॅन आहेत- नरेंद्र मोदी

माझ्या मनात खूप मोठमोठे प्लॅन आहेत. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कुणाला घाबरवणारे नाहीत किंवा कुणावर दबाव आणणारेही नाहीत. माझे निर्णय देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. जनकल्याणासाठी आहे. देशाच्या तरुणांसाठी मी उशिर करु इच्छित नाही. मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला, असं मोदींनी सांगितलंय.

योग्य दिशेने काम करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही भरपूर काही आहे, जे मला अजून करायचं आहे. प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न पूर्ण कसं होईल, ते मी पाहतो आहे. आतापर्यंत जे झालं ते ट्रेलर आहे, मी भरपूर काही करु इच्छित आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

गोळीबाराचं प्लॅनिंग कुठे झालं?, मोठी माहिती समोर

सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणाल्या…

मुंबईच्या पराभवानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याला झापलं, म्हणाला…

‘खोकेसम्राट, पलटीसम्राट असण्यापेक्षा..’, अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना डिवचलं

‘रोहित शर्मासाठी मी माझा जीव…’; प्रिती झिंटाचं मोठं वक्तव्य