या राशीच्या व्यक्ती प्रेमप्रकरणात यशस्वी होतील

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ३

वृषभ:- कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ रंग लाल, शुभ अंक ५

मिथुन:- मनातील नैराश्य दूर सारावेत. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येवू शकते. कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल. शुभ रंग निळा, शुभ अंक ८

कर्क:- कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. मानसिक त्रास करून घेऊ नका. फार हट्टीपणा करू नका. शुभ रंग हिरवा, शुभ अंक १

Today Horoscope l सिंह:- मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी वाद संभवतात. शुभ रंग काळा, शुभ अंक २

कन्या:- हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनात गैरसमजाला थारा देऊ नका. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ३

तूळ:- क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा वेग वाढवता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ९

वृश्चिक:- घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. काही बदल समजून घेऊन वागावे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. शुभ रंग विटकरी शुभ, अंक ६

धनू:- वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद वाढवू नका. हातापायाला किरकोळ इजा संभवते. अधिकाराचा गैरवापर टाळावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ७

मकर:- धार्मिक कामात मन गुंतवावे. बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. लहरीपणाने वागू नका. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ८

Today Horoscope l कुंभ:- आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नसते साहस करू नका. संयम सोडून चालणार नाही. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ५

मीन:- सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. कर्ज प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात काळजी घ्यावी. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ४

News Title – Today Horoscope

 

 

महत्त्वाच्या बातम्या –

“अजूनपण सांगतो नारळ द्या….,” मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

200 रूपये देतो सांगून प्रचाराला आणलं पण पैसेच दिले नाही; ‘त्या’ व्हिडीओने खळबळ

‘मागच्या 10 वर्षांत जे झालं तो फक्त ट्रेलर होता…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

गोळीबाराचं प्लॅनिंग कुठे झालं?, मोठी माहिती समोर

सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणाल्या…