ग्राहकांना होणार फायदा; जबदस्त चार्जिंग कॅपॅसिटीसह मोटोरोला कंपनीने लाँच केला स्मार्टफोन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

moto g64 5G l मोटोरोला आज आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Moto G64 5G फोन लाँच करत आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लाँच करण्यापूर्वीच दिली आहे. जर तुम्हाला जास्त चार्जिंग कॅपॅसिटीचा स्मार्टफोन हवा असेल तर Moto G64 5G सर्वात बेस्ट आहे.

moto g64 5G चे स्पेसिफिकेशन :

प्रोसेसर- मोटोरोला कंपनीने असा दावा केला आहे की, Moto G64 5G हा स्मार्टफोन जगातील पहिला फोन असेल जो MediaTek Dimensity 7025 chipset सह आणला जात आहे.

डिस्प्ले- नवीन मोटोरोला फोन 6.5 इंच LCD पॅनल, फुल एचडी + रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह आणला जात आहे. फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनने सुसज्ज असेल.

डिझाईन- हा स्मार्टफोन स्लिम, स्लीक, स्टायलिश, प्रीमियम आणि कलरफुल डिझाइनसह आणला जात आहे. फोन 8.89mm जाडी आणि 192 ग्रॅम वजन असणार आहे.

moto g64 5G l रॅम आणि स्टोरेज किती असणार :

मोटोरोला कंपनी फोन सेगमेंटमधील सर्वोत्तम 12GB + 256GB प्रकारात आणला जात आहे. फोन 8GB + 128GB व्हेरिएंटमध्ये देखील खरेदी केला जाऊ शकतो. फोनमध्ये 24GB पर्यंत रॅम बूस्ट करण्याची सुविधा असेल.

बॅटरी – मोटोरोलाचा नवा फोन ग्राहकांसाठी 6000mAh च्या मजबूत बॅटरीसह आणला जात आहे. फोन टर्बो पॉवर 33W फास्ट चार्जरसह आणला जात आहे.

कॅमेरा- कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे तर, हा नवीन स्मार्टफोन OIS सह शेक फ्री 50MP प्राथमिक कॅमेरासह लाँच होत आहे. मॅक्रो व्हिजन आणि डेप्थ कॅमेरासाठी फोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स असणार आहे. सेल्फीसाठी हा फोन 16MP फ्रंट कॅमेरासह आणला जात आहे.

News Title – moto g64 5G Smatphone Launched 

महत्त्वाच्या बातम्या –

केकेआर संघ संजू सॅमसनच्या यशस्वी रथाला मागे खेचणार का? आज रंगणार RR vs KKR

चंदा दो धंदा लो; या खेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे! संजय राऊत भ्रष्टाचारावरून कडाडले

तो आला, त्याने RCB च्या गोलंदाजांना धु धु धुतले; झळकावले सर्वात जलद शतक

मोठी बातमी! अखेर सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक

या राशीच्या व्यक्ती प्रेमप्रकरणात यशस्वी होतील