राम नवमीनिमित्त ‘या’ शहरात बँकांना सुट्टी; आजच सर्व कामे उरकून घ्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Navami Bank Holiday | देशात उद्या 17 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी केली जाईल. या निमितच अनेक शहरात बँका बंद राहणार आहेत. तर काही ठिकाणी सुरू राहणार आहेत. त्यामुळे बँकेतील सर्व व्यवहार आजच उरकून घ्या. आज तुमच्या ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य द्या.

आता कोणत्या शहरांत बँका सुरू असतील आणि कुठे नाही याबाबत आरबीआयने महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यात उद्या राम नवमी असल्याने बँका बंद राहणार आहेत. या सोबतच देशभरातील अनेक राज्यांमध्ये देखील बँकांना राम नवमीची सुट्टी देण्यात आली आहे. या बाबत आरबीआयने त्यांच्या संकेत स्थळावर बँक हॉलिडे निमित्त माहिती जारी केली आहे

‘या’ शहरांत बँका बंद राहतील

आरबीआयच्या यादीनुसार उद्या राम नवमी निमित्त मुंबई, नागपूर, पाटणा, रांची, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, कानपूर, लखनऊ, शिमला येथे बँका बंद राहतील.

यासोबतच महाराष्ट्र राज्यातही राम नवमीचा (Ram Navami Bank Holiday) उत्सव असल्याने बँका बंद राहतील. राम नवमी हा दिवस भगवान रामाची जयंती म्हणून देशभरात विविध शहरात साजरा केला जाणार असल्याने अनेक ठिकाणी या निमित्त सुट्टी देण्यात आली आहे.

अयोध्यामध्ये तर यावर्षी भव्य तयारी केली जात आहे. राम मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून अयोध्येत भाविक प्रचंड गर्दी करत आहे. यावर्षी येथे राम नवमी उत्सवाचा एक वेगळाच रंग पाहावयास मिळेल. कित्येक वर्षांनंतर येथे प्रभू राम परतले असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

‘या’ दिवशी बँक हॉलिडे

एप्रिल महिन्यात एकूण 17 दिवस बँकबंद राहणार आहेत. एप्रिलचा जवळपास अर्धा महिना संपला आहे. या आता 20 एप्रिलला आगरतळा येथे बँकेला सुट्टी राहील. तर 21 एप्रिलला रविवारमुळे देशातील (Ram Navami Bank Holiday) बँका बंद राहतील. 27 एप्रिलला चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहणार आहे. तर 28 एप्रिलला रविवारमुळे बँका बंद राहतील.

News Title – Ram Navami Bank Holiday