महाअष्‍टमीच्या शुभ योगात ‘या’ 5 राशींना धनलाभ होणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Horoscope Today | दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार वर्णन केलेले असते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, यासोबतच काही शुभ किंवा अशुभ घटना याबाबत भाकीत देते.

आज (16 एप्रिल) नवरात्रीची अष्टमी तिथी आहे. 9 दिवस चालणारा चैत्र नवरात्रीचा उत्सव आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. अष्टमीच्या दिवशी हवन आणि कन्यापूजा केली जाते.या दिवशीची पूजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. त्याशिवाय नवरात्रीचे व्रत आणि उपासना पूर्ण होत नाही. अष्टमीचा दिवस दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी खास असतो.

आजच्या चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग तयार होत आहेत. अष्टमीच्या दिवशी या योगांची निर्मिती अत्यंत शुभ मानली जाते. याचा 5 राशींसाठी खूप फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात महाअष्टमी मोठा धनलाभ घडून आणेल.

आजचे राशीभविष्य

वृषभ : आजचा दिवस (Horoscope Today) वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आहे. यांना आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रलंबित काम पूर्ण झाल्यानं मोठा दिलासा मिळेल.यांनी दानधर्मात कोणतीही कपात करू नका.

कर्क : आज तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती भेट देईल. तुमच्या कामात यश येईल. अष्टमीला शुभ योग तयार झाल्याने तुम्हाला नवीन संधी मिळतील. या दिवशी दुर्गादेवीची पूजा केल्यानंतर गरिबांना केळी वाटप करा. तुम्हाला लाभ होईल.

कन्या : आज तुम्ही आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात कराल.तुमच्या योजना सत्यात उतरतील. तुमचे अडकलेली कामेही आज पूर्ण होतील. पगारात वाढ होईल.चांगल्या ठिकाणी प्रवास योग आहे.

मकर : या शुभ योगामुळे (Horoscope Today) मकर राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होईल. आज मिळणाऱ्या संधीचे सोनं कराल. वैयक्तिक जीवनातही आनंदी राहाल. प्रियजनांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमचा दिवस छान जाईल. मनात भीती ठेऊ नका. सर्वांशी प्रेमाने वागा.

मीन : तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. तुमची बँक बॅलन्स वाढतच जाईल. तुमचे सर्व आर्थिक प्रश्न सुटतील.इतरही अनेक अडथळे दूर होतील. तुमच्या कार्यात यश प्राप्ती होईल. फक्त घाई करू नका. देवाचे आभार माना.

News Title- Horoscope Today 16 April

महत्वाच्या बातम्या-

चंदा दो धंदा लो; या खेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे! संजय राऊत भ्रष्टाचारावरून कडाडले

तो आला, त्याने RCB च्या गोलंदाजांना धु धु धुतले; झळकावले सर्वात जलद शतक

मोठी बातमी! अखेर सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक

या राशीच्या व्यक्ती प्रेमप्रकरणात यशस्वी होतील

“अजूनपण सांगतो नारळ द्या….,” मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्याची पोस्ट व्हायरल