नाशिककरांनो काळजी घ्या!; जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nashik News | नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. येथे स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले असून एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू देखील झाला आहे. यामुळे आरोग्य प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे. प्रशासनाकडून जिल्ह्यात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

स्वाईन फ्लूमुळे सिन्नरमधील एका महिलेचा मृत्यू तर शहरातील दोन जणांवर उपचार सुरू आहे. उन्हाच्या झळा वाहत असताना आता स्वाइन फ्लूचाही धोका वाढल्याने चिंता वाढली आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

जिल्ह्यात सर्वत्र विषाणूजन्य तापाची साथ सुरु असून त्यात आता स्वाईन फ्लूने भर घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. याचा धोका अजून वाढायला नको, म्हणून नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.

स्वाईन फ्लू होण्यामागील कारण काय?

स्वाईन फ्लूच्या (Nashik News) विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये याचा लवकर संसर्ग होतो.

त्यामुळे अशा व्यक्तींनी गर्दीत जायला टाळले पाहिजे. तसंच वेळेच्या व्यत्यय न करता लगेच उपचार घेणे आवश्यक आहे. संक्रमित झालेल्या व्यक्तीने शक्यतो आयसोलेटेड व्हायला हवे. यामुळे याचे संक्रमण होणार नाही.

स्वाईन फ्लूची लक्षणे

सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या जाणवतात.
घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यासारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो.
त्यामुळे प्रवास (Nashik News) करताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्ककहा वापर करावा.
ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.

News Title –  Nashik News Increased risk of swine flu