सूनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीला केवळ पाच दिवस राहिले आहेत. राज्याचं लक्ष निवडणुकीकडे लागलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूनं तगडी झूंज पाहायला मिळणार आहे. अशातच आता दोन्ही गटातून आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथे गेले असता, आधी मला निवडून आणलं नंतर मुलीला निवडून दिलं. आता सूनेला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. मात्र त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक असल्याचं म्हणत सूनेत्रा पवारांवर टीका केलेली.

शरद पवार (Sharad Pawar) सातारा येथे होते. त्यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये एका पत्रकाराने शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार या वक्तव्याचा दाखला देत शरद पवार यांना प्रश्न केला, त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मी असं बोललो नाही. इतरांनी काही वेगळा अर्थ काढण्याची काही गरज नसल्याचं शरद पवार म्हणालेत.

“महिलांना आरक्षण देणारा पहिला मुख्यमंत्री”

“महिलांचा काही इश्यू असेल तर मी सांगतो, या देशामध्ये महिलांच्या आरक्षणाचा निर्णय घेणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. शासकिय आरक्षणामध्ये माझा पहिला निर्णय होता. केंद्र सरकामध्ये असताना महिलांना लष्करात घेण्याचा माझा निर्णय होता. ज्या निर्णयामुळे महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल काळाची गरज आहे”, असं शरद पवार म्हणालेत.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार हे बारामती येथे असताना त्यांनी सूनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यावेळी बोलत असताना अजित पवार म्हणाले, “आधी मला निवडून दिलं, त्यानंतर ताईंना निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या. पवार आडनावाला निवडून द्या”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यावर शरद पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं म्हणत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच एका माध्यमाने सुनेत्रा पवार यांना शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न केला. त्यावर सुनेत्रा पवार या भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

News Title – Sharad Pawar Replied On Ajit pawar Statement

महत्त्वाच्या बातम्या

“अजूनपण सांगतो नारळ द्या….,” मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

200 रूपये देतो सांगून प्रचाराला आणलं पण पैसेच दिले नाही; कोल्हापूरातील ‘त्या’ व्हिडीओने खळबळ

‘मागच्या 10 वर्षांत जे झालं तो फक्त ट्रेलर होता…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

गोळीबाराचं प्लॅनिंग कुठे झालं?, मोठी माहिती समोर

सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणाल्या…