मतदान कार्ड हरवलयं तर नो टेन्शन! इतर कागदपत्रांच्या मदतीने करता येणार मतदान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Voters ID l राज्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पाच टप्प्यांत होणार असून, 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या मतदानाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र अशातच निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त, भारत निवडणूक आयोगाने मतदानासाठी इतर 12 प्रकारचे ओळख पुरावे स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. यापैकी कोणताही एक पुरावा सादर करून मतदार मतदान करू शकतात.

Voters ID l मतदानासाठी ही 12 प्रकारची ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार!

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारताच्या निवडणूक आयोगानुसार, ज्या मतदारांकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे, त्यांनी ते मतदान केंद्रावर ओळखीचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांकडे हे ओळखपत्र नाही ते मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर कोणताही वैध पुरावा सादर करू शकतात.

1) मतदान कार्ड
2) पासपोर्ट
3) वाहन चालक परवाना
4) फोटो असलेले कर्मचारी ओळखपत्र
5) छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
6) पॅनकार्ड
7) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीद्वारे दिलेले स्मार्टकार्ड
8) कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
9) मनरेगा जॉबकार्ड
10) छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
11) खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
12) आधारकार्ड

मतदानाच्या तारखेच्या किमान पाच दिवस आधी समजणार माहिती :

जर एखाद्या मतदाराने मतदार यादीत आपला पत्ता बदलला असेल आणि नवीन ओळखपत्र घेतले नसेल, तर त्याचे नाव सध्याच्या पत्त्यासह मतदार यादीत नोंदवलेले असेल तर जुने ओळखपत्र वैध असणार आहे. मतदानाच्या तारखेच्या किमान पाच दिवस आधी निवडणूक कार्यालय सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, रोल भाग क्रमांक, मतदानाची तारीख आणि वेळ याविषयी माहिती असलेल्या माहिती स्लिपचे वितरण करणार आहे.

तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे मतदानासाठी जाताना वोटर आयडी किंवा इतर 12 प्रकारापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावा लागणार आहे. त्या बारा पैकी एक वैध कागदपत्र दाखवल्यानंतर मतदान अधिकारी तुम्हाला मतदान करू देणार आहेत. तसेच जर तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचे असेल तर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा.

News Title – Voters can use any of the 12 approved ID

महत्त्वाच्या बातम्या –

ग्राहकांना होणार फायदा; जबदस्त चार्जिंग कॅपॅसिटीसह मोटोरोला कंपनीने लाँच केला स्मार्टफोन

पुण्यावर पाणी टंचाईचं तीव्र सावट, ‘इतक्याच’ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

केकेआर संघ संजू सॅमसनच्या यशस्वी रथाला मागे खेचणार का? आज रंगणार RR vs KKR

चंदा दो धंदा लो; या खेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे! संजय राऊत भ्रष्टाचारावरून कडाडले

तो आला, त्याने RCB च्या गोलंदाजांना धु धु धुतले; झळकावले सर्वात जलद शतक