सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जवळपास सर्वच जागा निश्चित झाल्या आहेत. मात्र अजूनही काही जागांचा तिढा कायम आहे. त्यात सांगली लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो. आता येथून एक मोठी बातमी समोर आली आहे.

मविआकडून ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण, काँग्रेसकडून याला विरोध केला जात आहे. काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व या जागेवरचा दावा सोडायला तयार नसल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

त्यातच काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये मविआचा उमेदवार नेमका कोण?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असताना विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

काय म्हणाले विश्वजित कदम?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला तातडीनं नागपुरात बोलावलं आहे. त्यासाठी मी नागपूर येथे आलोय. आम्ही सांगलीचा मुद्दा मांडला आहे. सांगलीच्या जागेवर लवकर तोडगा (Lok Sabha Elections 2024) काढावा, जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल, असं विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे सांगलीमध्ये आता उमेदवार बदलला जाणार काय?, अशा चर्चा रंगत आहेत. विश्वजित कदम यांनी सांगलीबाबत आपली भूमिका मांडली आहे. आता मविआ याबाबत काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सांगलीच्या जागेवरुन मविआत तिढा?

सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात गेल्या पंधरा दिवसापासून तिढा निर्माण झाला आहे. काँग्रेसने सांगलीच्या जागेवर हक्क सांगत आपली नाराजी कायम ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याकडे पाठ फिरवल्यानंतर घटक पक्षाच्या बैठकीकडेही (Lok Sabha Elections 2024) काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली होती.

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘माझी व माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, मात्र, शेतकर्‍याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे पुढे येऊन सांगावं.’, असं आव्हानच चंद्रहार पाटील यांनी दिलं आहे. त्यातच विश्वजित कदम यांचं वक्तव्य चर्चेत आलंय. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून मविआत वाद होण्याची शक्यता आहे.

News Title : Lok Sabha Elections 2024 Vishwajit Kadam big statement on Sangli candidature

महत्त्वाच्या बातम्या-

सूनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मतदान कार्ड हरवलयं तर नो टेन्शन! इतर कागदपत्रांच्या मदतीने करता येणार मतदान

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकावर दगडफेक!

महाअष्‍टमीच्या शुभ योगात ‘या’ 5 राशींना धनलाभ होणार!

राम नवमीनिमित्त ‘या’ शहरात बँकांना सुट्टी; आजच सर्व कामे उरकून घ्या