सरकारी यंत्रणेद्वारे शिवसेनेचा प्रचार, बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Akola Lok Sabha | देशामध्ये सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सुरू आहे. अनेक ठिकाणी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. असा प्रकार सतत घडताना दिसत आहे. हे चुकून घडत आहे की हे घडवलं जात आहे? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या कारभारावर बोट दाखवलं आहे. (Akola Lok Sabha)

देशात लोकसभेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या आचारसंहिता सुरू आहे. मात्र अकोला येथील वाशीम येथे एका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीवर धनुष्यबाण हे चिन्ह लावत गावोगावी पोहोचवण्याचं काम केलं जातंय. हा प्रकार वाशीम आगाराने केलाय. (Akola Lok Sabha)

प्रकाश आंबेडकर यांचा प्रहार

वाशीम आगार हा अकोले मतदारसंघात (Akola Lok Sabha) येत असून, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर हा प्रचार कोणाच्या आशीर्वादाने  सुरू आहे?, असा प्रश्न उपस्थित केला जातो. या कारभारामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली. कारण अकोला लोकसभा (Akola Lok Sabha) मतदारसंघात ही घटना घडली असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी प्रहार केला.

राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनावर धनष्यबाण चिन्ह

प्रकाश आंबेडकर हे आपल्या प्रचारासाठी जात असताना त्यांना रिसोड येथे एक पोस्टर बसवर दिसलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनावर धनष्यबाण हे चिन्ह लावल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी थेट फोटो काढून केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे. सरकारी यंत्रणांचा हा गोंधळ पाहायला मिळाला.

वाशीम मतदारसंघातील काही भाग हा यवतमाळमध्ये येतो. तिथं शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. त्याचे चिन्ह धनुष्यबाण आहे. त्याचा थेट प्रचार हा एसटीच्या माध्यमातून होताना दिसत असून याला सरकार आणि सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याचं पाहायला मिळतंय.

News Title – Akola Lok Sabha In Shivsena Using Bus For campaign

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्रीचं अनोखं फोटोशूट, सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

मोठी बातमी! बारामतीच्या राजकारणात अजून एक पवार, अजितदादांचं टेंशन वाढलं

मुंबईच्या पराभवानंतर बुमराहची फॅन मोमेंट, धोनीला पाहून म्हणाला…

सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट

श्रीकांत शिंदेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ