सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जागा वाटप जाहीर केलं आहे. त्यानुसार काँग्रेसला 17 जागा, शरद पवार गटाला 10 जागा तर उद्धव ठाकरे गटाला 21 जागा देण्यात आल्या आहेत.

काही ठिकाणी मात्र जागा वाटपावरून नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. सांगलीमध्ये कॉँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात गेल्या 15 दिवसांपासून वाद सुरू आहे. येथे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी शक्तीप्रदर्शन सुरु केलं असून यामुळे तेथे वाद निर्माण झाला आहे.

सांगलीत विशाल पाटील यांचं शक्तीप्रदर्शन

मविआत सांगलीची जागा ही उद्धव ठाकरे गटाला सुटली आहे. येथे ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व या जागेवरचा दावा सोडायला तयार नसल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरच आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

‘सांगलीची जबाबदारी ही काँग्रेसची आहे. त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी रोखावी. ज्या, ज्या ठिकाणी अशी बंडखोरी होणार आहे, त्या त्या ठिकाणी त्या, त्या पक्षाला बंडखोरी रोखावी लागणार आहे.’, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

आज 16 एप्रिल रोजी ठाकरे गटाचे मशाल गीत लॉन्च करण्यात आलं. तसंच नवीन चिन्ह जनसामान्यात नेण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपचा 45 प्लस हा आकडा महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील आहे. जनतेमध्येत त्यांच्याप्रती प्रचंड रोष आहे. हा रोष मतपेटीतून व्यक्त होणार असल्याचं ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

तसंच महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा लवकरच येणार असल्याचंही यावेळी ठाकरेंनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा लवकरच होणार आहेत. त्यासाठी जाहिराती तयार करण्याचं काम सुरु असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

News Title : Uddhav Thackeray big statement on Sangli candidature

महत्त्वाच्या बातम्या-

सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट

श्रीकांत शिंदेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

साताऱ्यातून उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे म्हणाले…

‘माझं राहुल गांधींसोबत लग्न…’; ‘या’ महिला नेत्याचा मोठा खुलासा

नाशिककरांनो काळजी घ्या!; जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला