‘बापासारखं मला…’; भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात पाणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vishal Patil | काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सोमवारी अपक्ष अर्ज दाखल केला आहे, तर आज मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत ( 16 एप्रिल ) अतिरिक्त अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटलांनी बंडखोरी केली आहे. या बंडामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. यानंतर मंगळवारी झालेल्या सभेत विशाल पाटील (Vishal Patil) भावूक झालेले दिसले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

विशाल पाटलांच्या डोळ्यात पाणी

1999 पासून मी काँग्रेसचं काम करत आहे. माझ्या वडिलांना खासदार म्हणून मी पाहिलं आहे. प्रत्येक घरातील पोराला आपल्या बापासारखं झालं पाहिजे, असं वाटतं. तसे मलाही वाटतं. वसंतदादांच्या घरात जन्माला आलो, ही माझी चूक झाली का? आजोबा आणि वडिलांसारखं झालो, तर ती माझी चूक आहे का? मी स्वार्थासाठी लढत नाही, असं सांगताना विशाल पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं.

“वसंतदादांच्या घरात जन्माला आलो, ही चूक झाली का?”

2002 साली मला जिल्हापरिषदेवर जायचं होतं, पक्षातील वरिष्ठांनी घराणेशाही होईल सांगितलं, मी थांबलो. 2005 साली वडिलांचं निधन झाल्यानंतर मी उभारलं पाहिजे, असं वाटत होते. उमेदवारी आमच्या घरात मिळाली, मी तक्रार केली नाही. लोक म्हणाली थांबा आणि कामाला लागा… तेव्हा मी सगळ्यात पुढे पळत होतो. जेव्हा, जेव्हा काँग्रेसनं थांबा म्हटलं, तेव्हा मी थांबलो, अशी खंत पाटलांनी व्यक्त केली.

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) आमने-सामने आले आहेत. सांगली मतदारसंघ जागावाटपात मिळावा म्हणून काँग्रेस नेत्यांनी अतोनात प्रयत्न केले.

सांगली जिल्ह्यातील नेते, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी दिल्लीलाही फेऱ्या मारल्या होत्या. पण, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगलीच्या जागेवर ठाम राहिल्यानं काँग्रेसला सांगलीच्या जागा सोडावी लागली. मात्र विशाल पाटलांनी कोणाचंच न ऐकता बंड करत अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

सरकारी यंत्रणेद्वारे शिवसेनेचा प्रचार, बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

राज्यात उष्णतेची लाट; राज ठाकरेंनी सरकारला केलं महत्त्वाचं आवाहन

अभिनेत्रीचं अनोखं फोटोशूट, सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

मोठी बातमी! बारामतीच्या राजकारणात अजून एक पवार, अजितदादांचं टेंशन वाढलं