‘सांगलीत शेवटच्या क्षणी काँग्रेसचा…’; विश्वजीत कदमांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sangli Lok Sabha | सांगली लोकसभेच्या जागेवरून (Sangli Lok Sabha) महाविकास आघाडीमध्ये गेले काही दिवस धुसफूस आहे. सांगलीतील जागा ठाकरे गटाकडे गेली असून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  त्या जागेवर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी दावा करत सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना विशाल पाटलांच्या बंडामुळे सांगलीतील राजकीय वातावरण हे चांगलं तापलेलं पाहायला मिळत आहे. विश्वजीत कदम हे गेले काही दिवसांपासून विशाल पाटील यांना सोबत घेत दिल्लीला जात वरिष्ठांसोबत सांगलीच्या जागेवर काँग्रसला उमेदवारी मिळवण्यासाठी चर्चा करत आहे. मात्र त्यानंतरही सांगलीची (Sangli Lok Sabha) जागा ही ठाकरे गटाला देण्यात आली. आता काँग्रेसचे स्थानिक नेते सांगलीची जागा सोडायला तयार नाहीत. अशातच आता विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या उमेदवारीवर मोठं वक्तव्य केलं. (Sangli Lok Sabh)

काय म्हणाले विश्वजीत कदम?

नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी आम्हाला ताबडतोब नागपूरला बोलावलं. मी सध्या नागपूरमध्ये आहे. सांगलीच्या जागेवर लवकरात लवकर तोडगा काढावा. जेनेकरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगली लोकसभेत ठोस पाऊल उचलता येईल, असं विश्वजीत कदम म्हणालेत. तसेच सांगलीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू. शेवटच्या क्षणीही काँग्रेसचा एबी फाॅर्म जोडला जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलंय.

विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेतून निवडणुकीचा फॉर्म भरला. मात्र अद्यापही काँग्रेसचा एबी फॉर्म दाखल केला नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले आहेत. एक काँग्रेस पक्ष आणि एक अपक्षचा फॉर्म भरला असल्याचं विश्वजीत कदम म्हणालेत.

विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं सांगितलं आहे. विशाल पाटील यांनी एक नाहीतर दोन फॉर्म भरले आहेत. त्यामुळे विशाल पाटील हे सांगली लोकसभेतून काँग्रसेमधून लढणार की अपक्ष लढणार हे पाहणं गरजेचं आहे. अशातच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानं विशाल चंद्रहार पाटील यांची मतं घेऊ शकतात असंही बोललं जात आहे.

News Title – Sangli Lok Sabha News Update About Congress Leader Vishwajit Kadam And Vishal Patil

महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यातून उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे म्हणाले…

‘माझं राहुल गांधींसोबत लग्न…’; ‘या’ महिला नेत्याचा मोठा खुलासा

नाशिककरांनो काळजी घ्या!; जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला

काळजी घ्या! ‘या’ शहरात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा

सूनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…