अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Loksabha Opinion Poll 2024 l सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे वारे फिरत आहेत. सर्वच राजकीय पक्षांसह कार्यकर्ते देखील प्रचारात दंग आहेत. अशातच एका मराठी वृत्तवाहिनीने देशातील सर्वात मोठा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या ओपिनियन सर्व्हेमध्ये देशभरातील तब्बल 543 जागांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Loksabha Opinion Poll 2024 l कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

ओपिनियन पोलसाठी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून काही नमुने घेण्यात आले होते. यामध्ये देशभरातील तब्बल 4123 विधानसभा जागांचा नमुने घेण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यामध्ये सर्वात जास्त जागा भाजपला मिळण्याची शक्यता पोलमधून दिसत आहे. या पोलनुसार भाजप पक्ष तब्बल 25 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

या सर्व्हेनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10 जागांवर यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष 5 जागांवर बाजी मारेल असे सर्व्हेतून दिसत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला अवघ्या 3 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर सर्वात धक्कादायक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असा अंदाज ओपिनियन पोलच्या आकडेवारीत दिसत आहे.

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं पडणार? :

ओपिनियन पोलच्या सर्व्हेमध्ये अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. या पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एनडीएला 40.22 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इंडिया आघाडीला 40.97 टक्के मिळण्याची शक्यता आकडेवारीतून दिसत आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा महायुती जिंकू शकते. धुळे लोकसभेची जागा ही भाजपच्या पारड्यात जाऊ शकते. तसेच लातूरची जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई उत्तर लोकसभेतून निवडणुकीच्या मैदानात असलेले पीयूष गोयल हे देखील बाजी पटकावतील. तर मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होण्याची शक्यता आहे. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामतीची जागा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता आहे.

News Title – Loksabha Opinion Poll 2024

महत्त्वाच्या बातम्या –

अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज

खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू

“बिश्नोईला आम्ही खतम करू”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

“4 दिवस सासूचे संपले आता सूनेचे 4 दिवस येऊ द्या”

‘सांगलीत शेवटच्या क्षणी काँग्रेसचा…’; विश्वजीत कदमांचं मोठं वक्तव्य