खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

धाराशिव | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. राज्यासह देशामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षासाठी प्रचार करताना दिसत आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. यामुळे उष्मघाताचे प्रमाण अधिक वाढलं आहे. अशातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. अशा स्थितीमध्ये अनेकजण पक्ष, पक्षातील कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत. मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं बाहेर पडणाऱ्यांना हवामान खात्यानं काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दरम्यान ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे यांच्या प्रचारावेळी आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांना प्रचारसभेमध्ये चक्कर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आमदार कैलास पाटील यांना आली चक्कर

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये धाराशिवचे आमदार प्रचारसभेमध्ये उपस्थित होते. ते प्रचारसभेमध्ये प्रचार करत असताना त्यांना चक्कर आली. त्यांना तातडीने रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सध्या कैलास पाटील (Kailas Patil) यांच्यावर खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कैलास पाटील (Kailas Patil) यांना उष्मघातामुळे हा त्रास झाला असल्याची माहिती समोर येत आहे. (Kailas Patil)

कैलास पाटील खासगी रूग्णालयात दाखल

ओमराजे यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळी त्यांना चक्कर आली. ते खाली पडले. तेथील काही उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना खासगी रूग्णालयामध्ये दाखल केलं.

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 19 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. ही निवडणूक ऐन उन्हाळ्यातच पार पडणार आहे. यामुळे अनेकदा हवामान अभ्यासकही मतदारांना काळजी घेण्यासाठी आवाहन करत आहेत.

निवडणुका तोंडावर आल्यानं ऐन उन्हाळ्यामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांना आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जावं लागत आहे. मात्र हवामान अभ्यासकांनी दुपारी बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. फार महत्त्वाचं काम असेल तर स्वत:ची काळजी घेत घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय.

News Title – Kailas Patil Dizzy In Dharashiv Campaign Meeting

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

सरकारी यंत्रणेद्वारे शिवसेनेचा प्रचार, बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

राज्यात उष्णतेची लाट; राज ठाकरेंनी सरकारला केलं महत्त्वाचं आवाहन

अभिनेत्रीचं अनोखं फोटोशूट, सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

मोठी बातमी! बारामतीच्या राजकारणात अजून एक पवार, अजितदादांचं टेंशन वाढलं