एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून धमकीचे फोन!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Khadse | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. अशातच एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकीचे फोन येऊ लागले असल्याची माहिती समोर आली.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. चार वेगवेगळ्या फोन नंबरद्वारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना 15 आणि 16 एप्रिल रोजी हे फोन कॉल्स आले होते.

काय दिली धमकी?

पहिल्यांदा आलेल्या फोनवर दाऊद आणि छोटा शकील तुम्हाला मारणार आहे, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा तुम्ही अद्यापही काहीही केलं नाही, लोकं तुम्हाला मारणार आहेत, अशी दुसऱ्यांदा धमकी दिली. चार ते पाचवेळा धमक्या आल्या, त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. हे फोन अमेरिका, उत्तरप्रदेश आणि लखनऊमधून आल्याची माहिती समोर आलीये.

धमकीनंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

मला चार ते पाच फोन आले आहेत. मुक्ताई पोलीस ठाण्यामध्ये मी तक्रार केली आहे. पण हे प्रकरण मला गंभीर वाटत नाही. मला त्यात तथ्य वाटत नाही. पोलीस त्याप्रकरणी चौकशी करतील. त्यात काय होणार ते पाहूया?, असं खडसेंनी  सांगितलं.

एकनाथ खडसे यांना काही वर्षांआधी दाऊदकडून धमक्या आल्या होत्या. त्यांनी दाऊदच्या पत्नीशी संभाषण केलं होतं? असे आरोप आहेत. त्याप्रकरणाचा आत्ता आलेल्या फोनशी काही संबंधं आहे का? यावर खडसेंनी भाष्य केलंय. दाऊदच्या पत्नीशी संभाषण करण्यात एक व्यक्ती सापडला होता. त्याला पोलिसांनी अटक केली, असं खडसेंनी सांगितलं.

स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला ही बाब सांगितली. त्या प्रकरणात काही आढळल्यास गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं, अशी मागणी आपण करणार असल्याचं एकनाथ खडसे म्हणालेत.

News Titlle – Eknath Khadse Threatened By Dawood Ibrahim Chhota Shakeel

महत्त्वाच्या बातम्या

आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो

अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर

अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज

खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू