आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

GT vs DC Team Prediction l आयपीएल 2024 च्या 32 व्या सामना आज रंगणार आहे. हा सामना गुजरात टायटन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. गुजरात टायटन्सने मागील सामन्यात राजस्थानचा 3 विकेट्सने पराभव केला होता. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने लखनौचा 6 गडी राखून पराभव केला आहे.

अशातच आज गुजरात आणि दिल्ली हे दोन्ही संघ सामनेसामने येणार आहे. गुणतालिकेत गुजरात टायटन्स 6 सामन्यांत 3 विजय आणि 3 पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्स 2 विजय आणि 4 पराभवांसह 9व्या स्थानावर आहे.अशा परिस्थितीत गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकता हे जाणून घेऊयात…

गुजरात विरुद्ध दिल्ली यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड :

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघ एकूण 3 वेळा भिडले आहेत. प्रथम फलंदाजी करताना दोन्ही संघांनी 1-1 असा विजय मिळवला. नंतर फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाला विजय मिळाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य शिलेदार :

डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ऋषभ पंत (C), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा

गुजरात टायटन्सचे संभाव्य शिलेदार :

शुभमन गिल (C), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन

GT vs DC या सामन्या संदर्भातील संपूर्ण माहिती :

GT vs DC Team Prediction l GT विरुद्ध DC सामना कधी खेळला जाईल? :

IPL 2024 चा 32 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 17 एप्रिल रोजी होणार आहे.

GT vs DC यांच्यातील IPL 2024 चा 32 वा सामना कुठे खेळवला जाईल? :

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील IPL 2024 चा 32 वा सामना 17 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

GT vs DC सामना किती वाजता सुरू होईल? :

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील IPL 2024 चा 32 वा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

GT vs DC सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल? :

स्टार स्पोर्ट्स चॅनलवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा थेट सामना पाहू शकता.

GT vs DC सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? :

जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे लाइव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहू शकता.

News Title – GT vs DC Team Prediction

महत्त्वाच्या बातम्या –

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो

अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर

अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज

खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू

“बिश्नोईला आम्ही खतम करू”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले