गुड न्यूज; गुंतवणूकदारांचे पैसे होणार दुप्पट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vodafone Idea FPO l देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया लिमिटेडचा एफपीओ गुरुवारी ओपन होत आहे. कंपनी या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर म्हणजेच FPO द्वारे 18,000 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचा FPO 18 एप्रिल 2024 रोजी उघडेल आणि त्यामध्ये 22 एप्रिलपर्यंत पैसे गुंतवले जाऊ शकतात. तर आज आपण FPO संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

भारतीय बाजारपेठेतील हा सर्वात मोठा FPO असणार :

टेलीकॉम कंपनी Vodafone-Idea ने लाँच केलेला FPO हा भारतीय बाजारपेठेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा FPO आहे. यापूर्वी येस बँकेने एफपीओच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर अदानी समूहाने गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारीमध्ये 20,000 कोटी रुपयांचा FPO आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नंतर तो मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

व्होडाफोन-आयडियाच्या FPO शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीने त्याची किंमत 10 ते 11 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित केली आहे. या FPO मध्ये तुम्ही एकाच वेळी 1298 शेअर्स खरेदी करू शकता. तसेच एकाच वेळी जास्तीत जास्त 14 लॉटमध्ये म्हणजे 18172 शेअर्समध्ये बोली लावता येईल. अशा परिस्थितीत किरकोळ गुंतवणूकदार एकावेळी 14,278 ते 1,99,892 रुपये गुंतवणूक करू शकतात.

Vodafone Idea FPO l कंपनी FPO निधीचे काय करेल? :

कंपनी या FPO मध्ये नवीन शेअर्स जारी करणार आहे. अशा परिस्थितीत एफपीओद्वारे उभारलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जाईल. यामध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी आणि 15 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या FPO मध्ये यशस्वी गुंतवणूकदारांना 23 एप्रिल रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. तसेच 24 एप्रिल रोजी शेअर्स डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील.

वोडाफोन-आयडियाला 2024 या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकूण 23,564 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल 32,045 कोटी रुपये आहे. 2023 च्या अखेरीस कंपनीवर एकूण 2.13 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, त्यापैकी या वर्षी कंपनीला एकूण 5,385 कोटी रुपये परत करायचे आहेत.

News Title – Vodafone Idea FPO Launched

महत्त्वाच्या बातम्या –

नवीन कार खरेदी करताय? तर अशाप्रकारे घ्या काळजी

एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून धमकीचे फोन!

विराटच्या चाहत्यांनो RCB ‘या’ वर्षी IPL ट्रॉफी जिंकणार

आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो