ऐश्वर्याने उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Marriage | 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून बाॅलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. एवढंच नाही तर यामध्ये मराठी कलाकरांचा देखील सहभाग आहे. मराठी अभिनेत्री पुजा सावंत हिने देखील काही दिवसांपूर्वी गपचूप साखरपुढा उरकला. त्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. दरम्यान, आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही लगीनघाई सुरू आहे.

तामिळ चित्रपट दिग्दर्शक शंकर यांची मुलगी ऐश्वर्या शंकर (Aishwarya Shankar) ही नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. ऐश्वर्याने तामिळ चित्रपट दिगदर्शक तरुण कार्तिकसोबत संसार थाटला आहे. या विवाहसोहळ्यात दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दिग्दर्शक मणीरत्नम यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

ऐश्वर्याच्या लग्नाचे फोटो समोर

सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्याचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. नेटकरी नवविवाहित जोडप्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि तरुणची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. काही महिन्यापूर्वीच ऐश्वर्याचा तरुण कार्तिकसोबत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर एका साध्या समारंभात ऐश्वर्या-कार्तिकने लग्न केलं.

ऐश्वर्या लग्नात लाल रंगाच्या आउटफिटमध्ये दिसून आली. तिने दागिने आणि न्यूड मेकअपसह आपला लूक कंप्लीट केला. तर, नवरदेव तरुणने गोल्डन रंगाचा धोतर-कुर्ता परिधान केला होता. त्यांच्या फोटोवर आता प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. सोशल मीडियावर ऐश्वर्याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. आता लग्नाच्या बातमीमुळे ऐश्वर्याचे चाहते प्रचंड आनंदित आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by CommonManMedia (@commonmanmedia)

ऐश्वर्याने दुसऱ्यांदा थाटला संसार

2021 मध्ये ऐश्वर्याने (Aishwarya) क्रिकेटपटू दामोदरन रोहितसोबत लग्न केलं होतं. कोविड-19 काळात शंकरने महाबलीपुरममधील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा आयोजित केला होता. पाहुण्यांच्या यादीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या लोकांचा समावेश होता. एका 16 वर्षीय मुलीने क्रिकेट प्रशिक्षक थमराय कन्नन यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात रोहितचेही नाव समोर आल्याने तो वादात अडकला होता. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. आता ऐश्वर्याने दिग्दर्शक तरुण कार्तिकसोबत दूसरा विवाह केला आहे.

एस. शंकर यांचे आगामी चित्रपट

दिग्दर्शक शंकर यांनी ‘इंडियन’, ‘बॉईज’, ‘शिवाजी द बॉस’, ‘आय’, ‘2.0’ (रोबोटचा सिक्वेल) आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सध्या ते कमल हसन यांच्यासोबत ‘इंडियन 2’ या चित्रपटावर काम करत आहेत.

News Title : Aishwarya Marriage with AD tarun karthik

महत्त्वाच्या बातम्या-

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो

अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर

अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज

खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू

“बिश्नोईला आम्ही खतम करू”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले