“नितीन गडकरींसारखा भ्रष्टाचारी कोणी नाही”, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitin Gadkari | लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. यापार्श्वभूमीवर राज्यामध्ये अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं भाजपच्या पहिल्या यादीमध्ये नाव नव्हतं तेव्हा महाविकास आघाडीकडून त्यांना ऑफर देण्यात आली. मात्र आता त्याच महाविकास आघाडीच्या काँग्रेस वरिष्ठ नेत्यानं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर टीका केलीये. त्यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) भ्रष्ट असल्याचं वक्तव्य केलंय.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजपमधून निवडणूक लढणार आहेत. तसेच रामटेक येथून महायुतीचे उमेदवार राजू पारवे लढणार आहेत. या दोन्ही नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. त्यावेळी भ्रष्टाचाराचे पैसे तिजोरीमध्ये जमा केल्याचं मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी गडकरी यांना भ्रष्टाचारी म्हणत टीका केली आहे.

नितीन गडकरींवर गंभीर आरोप

जुन्या पायाभूत सुविधा तोडून भाजपवाल्यांनी नवीन पायाभूत सुविधा करण्याच्या नावाखाली आपल्या लोकांना कंत्राट दिलं आहे. त्यामुळे भाजपची लोकं श्रीमंत झाली आहेत. सिमेंट, गिट्टी, वाळू पुरवठा करण्याचे कंत्राट आपल्याच कार्यकर्त्यांना भाजपने दिलंय, असा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार विलास मुत्तेवार यांनी केला. रात्री झालेल्या सभेमध्ये मुत्तेवार यांनी हे आरोप केले होते.

“गडकरींसारखा भ्रष्टाचारी नाही”

नागपुरसाठी एम्स रुग्णालय आमच्या काळात मंजूर झाले, ते आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उभारणार होतो.  मात्र नितीन गडकरी यांनी हे रूग्णालय शहराच्या 20 किमी बाहेर नेलं. मात्र नितीन गडकरी यांनी आम्ही बनवलेले डांबरी रस्ते खोदून काढले, फ्लायओव्हर तोडून नवीन फ्लायओव्हर केले. नागपुरात एक लाख कोटींचं काम केल्याचा दावा नितीन गडकरी करत आहेत. मात्र हे खोटं आहे. गडकरींना छोट्या रस्त्याऐवजी मोठा रस्ता केला. गडकरींसारखा भ्रष्टाचारी कोणी नाही, असा आरोप मुत्तेवार यांनी केला आहे.

गडकरी दोनदा नागपूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने जिंकून आले. यंदा त्यांची नागपूर मतदारसंघातील तिसरी लोकसभा निवडणूक आहे. यामुळे ते यंदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक करतील का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

News Title – Nitin Gadkari Currupted Congress Leader Vilas Muttemwar Statement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या बड्या नेत्याचा भयानक अपघात; प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

“मला लग्न करायचं नाही”, लग्नाच्या दिवशीच तरूणाने उचललं मोठं पाऊल

कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांची संपत्ती किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

लोकसभेच्या रिंगणात वंचितचा लढा कुणाविरोधात?, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

ऐश्वर्याने उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर