“पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी EVM मध्ये कचाकचा बटण दाबा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीमुळे दिग्गज नेते मंडळी प्रचार सभांचा धडाड घेत आहेत. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मागे नाहीत. आता तर अजितदादा भाजप आणि शिंदे गटासोबत युतीमध्ये असल्याने ते स्टार प्रचारक आहेत. आज (17 एप्रिल) ते इंदापुरात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत जोरदार भाषण केलं.

मतदारांना मोठं आवाहन देखील त्यांनी केलं. आम्ही इंदापूरकरांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. गावचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी हवा तेवढा निधी देऊ. पण आमच्यासाठीही कचा कचा कचा बटन दाबा, असं पवार म्हणाले आहेत. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

उद्या सुनेत्रा पवारांचा अर्ज भरणार

यावेळी त्यांनी पुण्यात होणाऱ्या सभेबाबतही मोठी माहिती दिली. उद्या देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात सभा होणार आहे. तसेच उद्याच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

यासोबतच सातारा आणि सांगली येथे देखील महायुतीच्या उमेदवाराचा उद्या अर्ज भरला जाईल. यावेळी फडणवीस आणि मी उपस्थित राहणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ही काही गावकीची निवडणूक नाही तर देशातील 140 कोटी जनतेची निवडणूक असल्याचंही ते म्हणाले.

अजितदादांचं मतदारांना आवाहन

पुढे अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील तोंडभरून कौतुक करत म्हटलं की, गेल्या 500 वर्षात जे झालं नाही ते देशात घडलं आहे. राम मंदिर बनण्याचे स्वप्न आज सत्यात उतरलं आहे. ते नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलंय. त्यांच्यामुळे आज अनेक जणांचे स्वप्न पूर्ण झालं आहे.

अजित पवार यांनी एक मिश्किल विधान देखील केलं. मी सत्तेला हापापलेलो नाही. मी सहा वेळा उपमुख्यमंत्री झालोय. मला नाही वाटत की माझा हा रेकॉर्ड कुणी तोडेल, असा विश्वासच अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी व्यक्त केला.

News Title : Ajit Pawar appeals to voters to vote

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपच्या बड्या नेत्याचा भयानक अपघात; प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

“मला लग्न करायचं नाही”, लग्नाच्या दिवशीच तरूणाने उचललं मोठं पाऊल

कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांची संपत्ती किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

लोकसभेच्या रिंगणात वंचितचा लढा कुणाविरोधात?, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

ऐश्वर्याने उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर