कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांची संपत्ती किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahu Chhatrapati Maharaj | महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे शाहू छत्रपती लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. कॉँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं आहे. त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. शाहू शहाजी छत्रपती यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केलं.

शाहू छत्रपती यांच्या संपत्तीचा आकडा प्रथमच समोर आला आहे. त्यांच्याकडे तब्बल 297 कोटी 38 लाख 8 हजार रुपयांची संपत्ती आहे. मंगळवारी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शाहूंचे दोन्ही चिरंजीव संभाजीराजे आणि मालोजीराजे हे देखील उपस्थित होते.

शाहू छत्रपती यांच्या संपत्तीचा आकडा समोर

शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून जवळपास 297 कोटींची संपत्ती आहे. तर, त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावावर 41 कोटी 6 लाखांची संपत्ती आहे. यात जंगम मालमत्ता 147 कोटी 64 लाख 49 हजार रुपयांची तर, स्थावर मालमत्ता 149 कोटी 73 लाख 59 हजारांची आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर 23.71 कोटींची स्थावर व 17.35 कोटींची जंगम मालमत्ता आहे.

शाहू छत्रपती यांच्याकडे 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे दागिने, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. त्यांच्या नावावर असलेल्या गाड्यांची किंमत सुमारे 6 कोटी आहे. त्यांच्या नावावर 122 कोटी 88 लाख किंमतीची शेतजमीन असून पत्नीच्या नावे 7.52 कोटी रुपये किंमतीची शेतजमीन आहे.

शाहू छत्रपती यांच्या नावे 297 कोटींची संपत्ती

त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. पण, त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. याच महिन्यात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्याकडे दोन व्हिंटेज कार आहेत. त्यात एक 1936 ची मेबॅच कार आहे. ही कार 1949 मध्ये खरेदी केली होती. यासोबतच 1962 चं मॉडेल असलेली व त्याच वर्षी खरेदी केलेली एक मर्सिडीज शाहूंकडं असून तिची किंमत सध्या 20 लाख रुपये आहे. तसंच त्यांच्याकडे 40 लाख रुपये किंमतीची मर्सिडीज आहे.

शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्याकडे मोठा राजवाडा देखीस आहे. 15.5 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या न्यू पॅलेस राजवाड्याचं सध्या बाजार मूल्य 18.11 कोटी रुपये आहे. आता लोकसभेत शाहू महाराज यांचा महायुतीचे संजय मंडलिक यांच्याशी लढा होईल.

News Title : Shahu Chhatrapati Maharaj wealth figure in front

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून धमकीचे फोन!

विराटच्या चाहत्यांनो RCB ‘या’ वर्षी IPL ट्रॉफी जिंकणार

आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो

अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर