तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ विभागात इतक्या पदांसाठी भरती सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NIOH recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. काही विभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी जराही वेळ वाया न घालवता याचा अर्ज दाखल करावा.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. आता यासाठी अर्ज कसा करायचा, याची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?, या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी काळजीपूर्वक ही माहिती वाचून घ्यावी.

सदर भरती प्रक्रिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थसाठी केली जाणार आहे.या भरती प्रक्रियेतून वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागामध्ये लिपिकांची पदे भरली जाणार आहेत. तरुणांसाठी नोकरी करण्याची हो मोठी संधी ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित अर्ज करावेत.

किती जागांसाठी भरती होणार?

या विभागात वरिष्ठ विभाग लिपिक एक जागा, कनिष्ठ विभाग लिपिक चार जागा भरल्या जातील. जर तुम्ही वरिष्ठ विभाग लिपिक पदसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. कनिष्ठ विभाग लिपिक पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही बारावी पास असणं (NIOH recruitment 2024) आवश्यक आहे.

‘असा’ भरा अर्ज

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थसाठी राबवल्या जाणाऱ्या भरतीसाठी तुम्ही https://www.nioh.org/ या साईटवर अर्ज भरू शकता. तसंच https://www.nioh.org/assests/pdf/jobs/2024/NIOH_Vacancy_Notification_LDC_UDC_2024_en.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना वाचायला मिळेल.

वयाची अट काय?

18 ते 27 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठीअर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे. म्हणजेच तुमच्याकडे फक्त आज आणि उद्या असे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करावा. वरिष्ठ विभाग लिपिक आणि कनिष्ठ विभाग लिपिक पदाच्या नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ (NIOH recruitment 2024) ऑक्युपेशनलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

मिळणार ‘इतकं’ वेतन

वरिष्ठ विभाग लिपिक या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास साधारण 25,500/- ते 81, 100/- रुपयांपर्यंत वेतन मिळेल. तर, कनिष्ठ विभाग लिपिक या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास साधारण 19,900 ते 63,200 रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.

News Titlle : NIOH recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्याने उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

गुड न्यूज; गुंतवणूकदारांचे पैसे होणार दुप्पट

नवीन कार खरेदी करताय? तर अशाप्रकारे घ्या काळजी

एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून धमकीचे फोन!

विराटच्या चाहत्यांनो RCB ‘या’ वर्षी IPL ट्रॉफी जिंकणार