“सांगली सुसंस्कृत, इथं…’; विशाल पाटील संजय राऊतांवर कडाडले

Sangli Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघाचा तिढा सुटत नाहीये. महाविकास आघाडीकडे सांगलीची जागा आली. मात्र सांगलीवर उद्धव ठाकरे यांनी दावा सांगितला आणि चंद्रहार पाटील यांना संधी दिली. सांगली येथे काँग्रेसचं मताधिक्य असल्याचं स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, असा दावा काँग्रेस नेते आणि बंडखोर विशाल पाटील यांनी केला. सांगली येथे बोलत असताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

“सांगली सुसंस्कृत, इथं शोभणारी भाषा बोलावी”

विशाल पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत सांगलीत गोंधळ घालून गेलेत. सांगली सुसंस्कृत आहे इथं त्यांनी शोभणारी भाषा बोलावी. आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत. त्यामुळे त्यांनी लोकांवर पुस्तकांचे शब्द वापरून लोकांना पेटवून देऊ नये,” असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. दरम्यान विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचे दोन फॉर्म भरले आहेत.

चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नेते विशाल पाटील नाराज आहेत. विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे त्यांनी एक नाहीतर दोन फॉर्म भरले आहेत. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे.

ही लढाई भाजपच्याविरोधात आहे. ही लढाई आपल्यात नाही. यामुळे आम्ही एकत्र आलो असल्याचं ते कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना म्हणालेत. यावेळी बोलत असताना त्यांनी शिवसेनेला वसंतदादांनी आवाज दिला आहे. मात्र तोच आवाज वसंतदादांविरोधात वापरला जात असल्याचं, विशाल पाटील म्हणालेत.

मी उभं राहिलो की पक्षाने मला बस म्हणल्यावर बसायचो. काँग्रेस पक्षावर आमचं एकतर्फ प्रेम आहे. जुन्या काळातील एक हिंदी गाणं आहे. ‘कितने भी तू करले सितम, हस हस के सहेंगे हम, ये प्यार ना होंगा कम…. त्यामुळे कितीही आम्हाला छळलं तरीही आम्ही काँग्रेसवरचं प्रेम कमी होऊ देणार नाही, असं विशाल पाटील म्हणालेत.

News Title –  Sangli Lok Sabha In Vishal Patil On Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

‘बापासारखं मला…’; भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात पाणी

सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

सरकारी यंत्रणेद्वारे शिवसेनेचा प्रचार, बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

राज्यात उष्णतेची लाट; राज ठाकरेंनी सरकारला केलं महत्त्वाचं आवाहन

अभिनेत्रीचं अनोखं फोटोशूट, सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…