अमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलं ट्रोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amir Khan | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. मनोरंजन विश्वातील दिग्गजांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. अभिनेत्री कंगना राणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर अभिनेता गोविंदानं काही दिवसांआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. तर अरूण गोविल देखील मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. याचदरम्यान अभिनेता अमिर खान (Amir Khan) देखील एका पक्षाचा प्रचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

अमिर खानचा काँग्रेसला पाठिंबा?

अभिनेता अमिर खानचा (Amir Khan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र तो व्हिडीओ फेक असल्याची माहिती समोर आली आहे. अमिर खानच्या (Amir Khan) टीमने अमिर खानचा (Amir Khan) प्रचार करतानाचा व्हायरल व्हिडीओ फेक असल्याचं सांगितलं आहे. 2024 रोजी प्रचाराच्या तोंडावर फेक व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानं आता अमिर खान संतापला आहे.

अमिर खान आणि त्याच्या टीमने संताप व्यक्त केला असून त्या फेक व्हिडीओ विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तसेच सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ हा बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. अमिर खानचा व्हिडीओ हा मागील वर्षीचा आहे, असं अमिर खानच्या टीमने दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केलं आहे.

“कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही”

“आम्ही हे सांगू इच्छितो की आमिर खाननं त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही. उलट त्यानं गेल्या वर्षी निवडणूक आयोगाच्या जनजागृती मोहिमेद्वारे लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यास मदत केली.”

अमिर खानचा डीपफेक व्हिडीओ आहे. AI पद्धतीचा व्हिडीओ असल्याचं समजतंय. बॉलिवूड, दक्षिणात्य अभिनेत्रींचे अनेक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

News Title – Amir Khan Political Party Campaign Fake Viral Video

महत्त्वाच्या बातम्या

‘सांगलीत शेवटच्या क्षणी काँग्रेसचा…’; विश्वजीत कदमांचं मोठं वक्तव्य

‘बापासारखं मला…’; भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात पाणी

सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

सरकारी यंत्रणेद्वारे शिवसेनेचा प्रचार, बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

राज्यात उष्णतेची लाट; राज ठाकरेंनी सरकारला केलं महत्त्वाचं आवाहन