“वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amit Thackeray | मनसेसोबत बरीच वर्षे एकनिष्ठ राहिलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची साथ सोडली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. पुण्यात लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. आता मोरे हे वंचितकडून निवडणुकीत उभे राहिले आहेत.

त्यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिलं आहे. वसंत मोरे आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत. अशातच वसंत मोरे यांच्यावर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी निशाणा साधला. ते आज 17 एप्रिलरोजी पुण्यात मनसेच्या कार्यालयात आले असता त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरेंनी अनेक मुद्यांवर चर्चा केली.

वसंत मोरे यांच्यावर टीका

‘वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचंय. ते सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा. महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावं’, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला.

महाविकास आघाडीचा राज्यात पराभव होणार आहे. देशात मोदींचा 400 पारचा नारा पूर्ण होईल. मविआचा मुंबईत एकाही जागेवर  विजय होणार नाही, असं अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले आहेत.

मोदी-ठाकरे एकाच मंचावर येणार?

यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या सभेबाबतही माहिती दिली. लवकरच मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळतील. राज ठाकरे आणि मोदी हे एकत्रित सभा घेण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली. पण, या सभा नेमक्या कधी होणार, याबाबत त्यांनी कोणताच खुलासा केला नाही.

त्यामुळे लवकरच राज ठाकरे आणि मोदी एकत्र दिसून येतील. यावेळी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याबाबतही मोठं विधान केलं. राज साहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच बिनशर्थ पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार, असं अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले.

News Title : Amit Thackeray on Vasant More  

महत्त्वाच्या बातम्या-

‘हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर काढेन…’, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा

“नितीन गडकरींसारखा भ्रष्टाचारी कोणी नाही”, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

“पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी EVM मध्ये कचाकचा बटण दाबा”

भाजपच्या बड्या नेत्याचा भयानक अपघात; प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

“मला लग्न करायचं नाही”, लग्नाच्या दिवशीच तरूणाने उचललं मोठं पाऊल