‘…म्हणून मध्येच चित्रपट सोडला’; रणदीपबद्दल महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahesh Manjrekar | मराठी आणि बॉलिवूडचे दिग्दर्शक, अभिनेते, लेखक आणि निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) वीर सावरकर चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हणाले होते. मात्र महेश मांजरेकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका केलेला अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांच्यात वाद झाला. यामुळे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी सिनेमा सोडला. सिनेमा सोडण्याचं कारण महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी सांगितलं आहे.

2021 रोजी महेश मांजरेकर सिनेमाच्या निर्मितीसाठी पुढं सरसावले होते. मात्र रणदीप हुड्डा आणि महेश मांजेकर यांच्यात दिग्दर्शन आणि चित्रपटाच्या स्क्रिप्टवरून वाद झाल्याने 2022 रोजी महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतून काढता पाय घेतला. त्याचं कारण मांजरेकर यांनी सांगितलं, “मी प्रोजेक्ट मध्येच सोडल्यानंतर वीर सावरकरांचे विचार मला पटत नाहीत, अशी टीका झाली होती. मी तेव्हा काहीच बोललो नव्हतो. पण आता चित्रपट प्रदर्शित झाला आहे तर मी स्पष्ट बोलतो. मला सावरकरांचं प्रचंड आकर्षण आहे. ज्यांनी हा चित्रपट केला. त्यांना याचं काही घेणंदेणं नाही,” असं महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) म्हणालेत.

“चित्रपट कसा बनवायचा हे सुद्धा मला शिकवणार का?”

“रणदीपला चित्रपटामध्ये इंग्लंडचा राजा, हिटलर, इंग्लंडचे पंतप्रधान हे सर्व पाहिजे होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो देखील भाग त्याला हवा होता. आता हे सावरकरांच्या बायोपिकशी कसं संबंधित आहे. मला कळत नव्हतं. रणदीपला चुकीचे भाग देखील चित्रपटामध्ये सामाविष्ट करून घ्यायचे होते. शुटींगवेळी तो सतत हस्तक्षेप करायचा. आता चित्रपट कसा बनवायचा हे सुद्धा मला शिकवणार का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मी वैतागून निर्मात्यांना म्हटलं की एकतर त्याला निवडा किंवा मला. ती माझी कथा होती आणि मला माझ्या पद्धतीनुसार चित्रपट बनवायचा होता. म्हणूनच मी निर्मात्यांना प्रोजेक्टमध्ये आणलं होतं. मी रणदीपच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र वेडेपणा आणि प्रामाणिकपणा यात फरक असल्याचं”, महेश मांजरेकर म्हणालेत.

“सावरकर काळे की गोरे हे देखील माहिती नव्हतं”

त्याला सावरकर काळे की गोरे हे देखील माहिती नव्हतं. त्याला आधी वाटलं होतं की सावरकर व्हिलन आहेत. मी त्याला नीट वाचायला सांगितलं. चित्रपटाचे 70 टक्के स्क्रिप्ट माझं आहे. त्याने शुटींगदरम्यान अनेक बदल सांगितले. त्यामुळे शुटींग लांबलं आणि बजेट वाढू लागलं होतं. चित्रपटामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नको होता. त्याचं यश आणि अपयशाची जबाबदारी घ्याला मी पूर्णपणे तयार होतो. मला कोणालाही दोष द्यायचा नव्हत, असंही त्यांनी म्हटलंय.

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाने आतापर्यंत 20 कोटी कमाई केली. या चित्रपटामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाईंची भूमिका बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेनं केली आहे.

News Title – Mahesh Manjrekar On Veer Savarkar Cinema Actor And Director Randeep Hooda

महत्त्वाच्या बातम्या

गुड न्यूज; गुंतवणूकरणाचे पैसे होणार दुप्पट

नवीन कार खरेदी करताय? तर अशाप्रकारे घ्या काळजी

एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून धमकीचे फोन!

विराटच्या चाहत्यांनो RCB ‘या’ वर्षी IPL ट्रॉफी जिंकणार

आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार