“अस्तित्वालाच नाकारण्याचं काम…”, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | राम नवमी हा उत्सव देशभरामध्ये साजरा होताना दिसतोय. यंदाचं वर्ष हे राम नवमीसाठी खास आहे. सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. अनेक वर्षांपासून आयोध्येतील राम मंदिरासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशातील उत्तरप्रदेशमधील आयोध्येत राम मंदिर बांधण्यात आलंय. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरचा देशातील पहिलाच राम नवमी उत्सव पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी त्या पोस्टमधून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

“श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली.” (Raj Thackeray)

“अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना…”

“ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो. धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो. पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !”, अशी पोस्ट राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याला नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा विषय मार्गी लावल्याचं राज ठाकरे म्हणालेत. महायुतीच्या प्रचारासाठी काम करणार असल्याचंही ते म्हणालेत. यामुळे मनसेचे काही कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. तसेच राज ठाकरे यांना काहींनी राम राम करत वेगळा मार्ग स्विकारला आहे. (Raj Thackeray)

दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळेल अशी चर्चा होती. कारण या भागात मराठी रहिवाशांची लोकसंख्या अधिक आहे. मनसेकडून ही जागा लढवली गेल्यास राज ठाकरे यांचे अरविंद सावंत हे अडचणीत येतील. अद्यापही दक्षिण मुंबईच्या जागेवर उमेदवार कोण असेल याबाबत सस्पेन्स कायम आहे.

News Title – Raj Thackeray Ram Navmi Post Against Congress

महत्त्वाच्या बातम्या

आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो

अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर

अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज

खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू