“वाढपी वाढतोय म्हणजे..”, राजेंद्र पवार अजित पवारांवर संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अवघ्या देशाचं लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे (Baramati Loksabha) आहे. पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. येत्या 18 एप्रिल रोजी अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या कन्या आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे या देखील त्याच दिवशी अर्ज भरणार आहे. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसा प्रचाराने जोर धरला आहे. आता रोहित पवार यांचे वडिल आणि अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांना सुनावलं. (Baramati Loksabha)

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. त्यावेळी राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये माझ्या निवडणुकीला प्रचार केला नाही. आता कसं गरागरा फिरत आहात? असं म्हणत अजित पवारांनी भाऊ श्रीनिवास पवारांना सुनावलेलं. त्यावर आता राजेंद्र पवार यांनी उत्तर दिलं. (Baramati Loksabha)

“आम्ही सायकलवरून प्रचार केला”

आम्ही अजितदादांचा प्रचार केला नाही असं नाही. आम्ही याआधी अनेकदा प्रचार केलाय. आम्ही सायकलवरून प्रचार केला आहे. प्रचार केला नाही, हा आरोप योग्य नसल्याचं राजेंद्र पवार म्हणालेत.

“छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी आम्ही प्रचार करतो. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार निवडणूक लढवत होते. तेव्हा आम्ही तिकडे जोर लावला होता. निवडणुकीत गाव ते गाव, घर ते घर असा प्रचार केला आहे”, असं राजेंद्र पवार म्हणालेत. “गेल्या 35 वर्षात निवडणुकीत प्रचार केला नाही असं म्हणत असाल तर आम्ही काय म्हणणार?”, असा सवाल राजेंद्र पवार यांनी केला आहे. (Baramati Loksabha)

“वाढपी वाढतोय याचा अर्थ स्वयंपाक आपण केला असल्याचा समज”

अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यावर नुसती भाषणं करून विकास होत नसल्याचा आरोप करत आहेत, असं पत्रकारांनी राजेंद्र पवारांना विचारलं. यावर राजेंद्र पवार म्हणाले की, “विकासनिधी हा एकत्रित होता. त्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही निधी होताच. अजित पवार हे राज्यात असल्याने त्यांना अधिक निधी आहे हे मान्य आहे. पण स्वयंपाक सर्वांनी मिळून केला होता. वाढपी वाढतोय याचा अर्थ स्वयंपाक आपण केल्याचा समज त्यांचा झाला”, असं राजेंद्र पवार म्हणालेत.

बारामतीत त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त राहतो. ते राजकीय जीवनात कार्यरत आहेत. मी समाजकारणात आहे. कुटुंबाचा भाग म्हणून आम्ही हे स्विकारलं आहे, असं राजेंद्र पवार म्हणालेत.

News Title – Baramati Loksabha Rajendra Pawar On Ajit pawar

महत्त्वाच्या बातम्या

अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ मतदारसंघातून लढण्याची केली घोषणा

“वाढपी वाढतोय म्हणजे..”, राजेंद्र पवार अजित पवारांवर संतापले

काळजी घ्या! ‘या’ शहरात 10 वर्षानंतर सर्वाधिक तापमान

अभिनेत्री प्रियंका चोप्राचा अपघात, फोटो आला समोर

“अस्तित्वालाच नाकारण्याचं काम…”, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत