सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan l गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता. आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून या गोळीबार प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला आहे. गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक या प्रकरणाचा खुलासा करत आहेत. या तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबाराचा मोठा कट :

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना विविध टप्यावर अनोळखी व्यक्तींकडून विविध गोष्टी पुरवण्यात आल्या असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी या वस्तू देण्यासाठी येणारी व्यक्ती आरोपींसाठी अनोळखी असायची. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे. तर खर्चासाठी लागणारे पैसे देखील अनोळखी व्यक्तीने दिले होते. याशिवाय घर भाड्याने घेण्यासाठी देखील अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींना अनोळखी व्यक्तींकडूनच सीमकार्ड पुरवण्यात आले होते. मात्र या अनोळखी व्यक्ती आणि आरोपींमध्ये समन्वय ठेवणारी व्यक्ती ही एकच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फायरिंगचा कट रचताना अनमोल बिष्णोईच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. फायरिंग करण्यापूर्वी आणि केल्यानंतर दोघांमध्ये एक व्यक्ती हा मध्यस्थी म्हणून काम करत असल्याचं देखील तपासात समोर आलं आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या अगदी काही तास आधी नेमबाजांना बंदूक पुरवण्यात आली होती. त्या बंदुकी 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात पुरवल्या होत्या. 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला आहे. मात्र बंदूक पुरवणारी व्यक्ती कोण होती? याबाबतचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

Salman Khan l आरोपींना 12 गोळ्या झाडण्याचे दिले होते आदेश :

सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. सलमान खानला घाबरवण्यासाठी बिश्नोई गँगकडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबार करायला लावल्याची माहिती आहे. आरोपींना घरावर कमीत कमी दोन मॅगेझिन फायर करण्याचे टारगेट दिले होते. 2 मॅगेझिन म्हणजेच अर्थातच 12 गोळ्या फायर करा असे आदेश हल्लेखोरांना देण्यात आले होते.

मात्र आरोपींचा 12 गोळ्या फायर करता आल्या नाहीत. तसेच या दोन्ही आरोपींना कामासाठी आधी 1 लाख मिळाले होते, अशी माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. याशिवाय काम पूर्ण झाल्यावर आरोपींना आणखी 3 लाख मिळणार असल्याची माहिती देखील तपासात उघड झाली आहे.

News Title: Salman Khan firing case Updates

महत्त्वाच्या बातम्या-