आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PBKS vs MI Team Prediction l आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सची कामगिरी काही विशेष झाली नाही. चालू हंगामात पंजाब संघाने 6 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या संघाला 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघाने चालू हंगामात फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने गमावले आहेत.

मुल्लानपूरची खेळपट्टी कधी आहे? :

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (PBKS vs MI) यांच्यातील रोमांचक सामना महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे खेळवला जाणार आहे. पंजाबचे हे नवे होम ग्राउंड आहे, जिथे आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत.

या मैदानावर खेळला गेलेला शेवटचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला होता, तो सामना राजस्थानने 3 विकेट्सने सामना जिंकला होता. गेल्या सामन्यात या मैदानावर पंजाबचे फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले.

मुल्लानपूरच्या खेळपट्टीवर फलंदाज चौकार-षटकार मारताना दिसत आहेत. मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचे एकूण 3 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये एक सामना यजमान संघाने जिंकला, तर 2 सामने पाहुण्या संघाने जिंकले आहेत. या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या 180 धावा आणि सर्वात कमी धावसंख्या 147 धावांची होती.

PBKS vs MI Team Prediction l दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार :

पंजाब किंग्सचे संभाव्य शिलेदार : जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (C), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा

मुंबई इंडियन्सचे संभाव्य शिलेदार : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल

News Title: PBKS vs MI Team Prediction

महत्त्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसेची फिल्डिंग; बैठकीत काय काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींबद्दल अमित ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

…तर तुतारी वाजवून टाका!; भाजप उमेदवार सुजय विखेंच्या आवाहनामुळे नगरमध्ये एकच खळबळ

अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ मतदारसंघातून लढण्याची केली घोषणा