पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसेची फिल्डिंग; बैठकीत काय काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Murlidhar Mohol | नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे, त्यानंतर आता प्रत्यक्ष मतदारसंघांमध्ये सक्रीय पाठिंबा देण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. मनसेची पुण्यात चांगलीच ताकद आहे, त्यामुळे येथील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभं राहण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी अमित ठाकरे यांनी मोहोळ यांना विजयाचा विश्वास दिला.

पुण्यात दोन्ही नेत्यांची भेट-

मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत, यावेळी मनसेच्या पुणे शहर कार्यालयात मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी अमित यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे त्यांनी प्रथमतः आभार मानले. याप्रसंगी अमित ठाकरे यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या.

मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात पूर्णपणे सक्रिय असेल, असा विश्वास अमित ठाकरे यांनी मोहोळ यांना दिला. मनसेच्या वतीने यावेळी मोहोळ यांचा सत्कार देखील करण्यात आला. या भेटीनंतर मोहोळ आणि मनसेचे सरचिटणीस बाबू वागसकर यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने उपस्थित होते.

अमित ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय झालं?

‘मनसेचे नेते अमितजी ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार लावतील, असा शब्द त्यांनी मला दिला. प्रचार रणनीतीबाबतही त्यांच्यासोबत चर्चा झाली, त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आमचा विजय आणखी सोपा झाला आहे. राजसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे, मनसेची मोठी ताकद शहरात आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे, त्यामुळे विजय आमचाच आहे, असं मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यावेळी म्हणाले.

मनसे सरचिटणीस वागसकर यांनी देखील या भेटीवर भाष्य केलं. “राजसाहेब ठाकरे यांनी नुकताच महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला, त्यानुसार आमचे नेते अमितजी ठाकरे सर्वच शहरात जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज पुणे मनसेसोबत चर्चा केली. आम्हा सर्वांना सोबत घेऊन, सन्मानाने वागणूक देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्यास सांगितलं आहे, त्यानूसार आम्ही एकदिलाने प्रचार करुन मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना निवडून आणू, असं त्यांनी म्हटलं आहे.

News Title: Amit Thackeray Murlidhar Mohol Pune Meetup

महत्त्वाच्या बातम्या-

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींबद्दल अमित ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

…तर तुतारी वाजवून टाका!; भाजप उमेदवार सुजय विखेंच्या आवाहनामुळे नगरमध्ये एकच खळबळ

अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ मतदारसंघातून लढण्याची केली घोषणा

“वाढपी वाढतोय म्हणजे..”, राजेंद्र पवार अजित पवारांवर संतापले

काळजी घ्या! ‘या’ शहरात 10 वर्षानंतर सर्वाधिक तापमान