राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींबद्दल अमित ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

Amit Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून नवनवीन खुलासे करत असतानाचं चित्र पहायला मिळत आहे. पाडवा मेळाव्यात राज ठाकरेनी सभा घेत गृहमंत्री अमित शाहा यांच्या भेटी मागचं कारण सांगितलं. शिवाय भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय देखील घेतला. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे काही मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपला बिनशर्त पाठिंबा का देणार याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची बातमी समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आज (17 एप्रिल) रोजी पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोलत असताना अमित ठाकरे म्हणाले की, लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पुढे (Amit Thackeray) ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचे आवाहन केलं होतं. तसेच लवकरच प्रचार सभा घेण्याचं पण त्यांनी जाहीर केलं आहे.

मनसेकडून नवे आदेश-

पुणे दौऱ्यावर असताना अमित ठाकरे यांनी बैठक घेतली. या वेळी त्यांनी काही आदेश दिले आहेत. महायुतीला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. महायुतीचे काम करण्यासंदर्भात आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत मनसेनेच्या वतीने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. जे मनसे पदाधिकारी पक्षाचे काम करणार नाहीत, तसेच विरोधात जाऊन काम करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा आदेश सुद्धा आता मनसेकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे महायुतीसाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मनसे दणका देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

100 जागांवर फटका-

भाजपने 400 पाराचा नारा दिला आहे, असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. या वेळी लोकसभा निवडणूकीत भाजप या जागा जिंकू शकेल, असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं. तर 100 जागांवर फटका बसणार असल्याचा विश्वास अमित ठाकरेंनी व्यक्त केला.

News Title : Amit Thackeray reveals the truth

महत्त्वाच्या बातम्या-

“वाढपी वाढतोय म्हणजे..”, राजेंद्र पवार अजित पवारांवर संतापले

काळजी घ्या! ‘या’ शहरात 10 वर्षानंतर सर्वाधिक तापमान

अभिनेत्री प्रियंका चोप्राचा अपघात, फोटो आला समोर

“अस्तित्वालाच नाकारण्याचं काम…”, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

‘…म्हणून मध्येच चित्रपट सोडला’; रणदीपबद्दल महेश मांजरेकर स्पष्टच बोलले