टी 20 विश्वचषकातील टीम इंडियाचे संभाव्य शिलेदार जाहीर; या खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup

T20 World Cup l वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे. आयसीसीचा हा मेगा इव्हेंट 1 जून ते 29 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात आहेत. टीम इंडिया 5 जूनपासून आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 9 जून 2024 रोजी न्यूयॉर्कमध्ये भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

विकेटकीपिंगसाठी या खेळाडूंमध्ये होणार स्पर्धा :

विकेटकीपिंगसाठी संजू सॅमसन, जितेश शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. यामध्ये केएल राहुल आणि इशान किशन आघाडीचे फलंदाज आहेत. यावेळी आयपीएलमध्ये दोघांनी टॉप ऑर्डरवर फलंदाजी केली आहे. अशापरिस्थितीत या दोघांच्या प्रभावाचे विश्लेषण करणे निवडकर्त्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांची टी-20 विश्वचषक संघात निवड जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. हे सर्व खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाची निवड समिती या खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

T20 World Cup l गिल-जयस्वाल यांच्यात होणार चुरशीची लढत :

टी-20 विश्वचषक स्पर्धेत शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे. जयस्वाल यांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये काही विशेष कामगिरी केली नाही. मात्र निवडकर्त्यांना डावखुरा फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये ठेवायचा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडूंची संघात निवड झाल्यास रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.

फलंदाज : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, शुभमन गिल

विकेटकीपर-फलंदाज: ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन.

अष्टपैलू खेळाडू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा

स्पेशलिस्ट फिरकीपटू : कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई.

वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

News Title – T20 World Cup Squad

महत्त्वाच्या बातम्या

भाजपची धाकधूक वाढली; ‘हे’ दोन मतदारसंघ जिंकणं कठीण

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .